'या' व्यक्तीमुळे झाली अशोक मामांची कलाविश्वात एन्ट्री; निशिगंधा वाड यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 03:53 PM2022-07-03T15:53:44+5:302022-07-03T15:57:12+5:30

Ashok saraf: कसदार अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे प्रेक्षकांशी जोडले गेलेले मामा या कलाविश्वात नेमके कसे आले हा प्रश्न अनेकांना पडतो.

उत्तम अभिनयकौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अशोक सराफ.

आजवरच्या कारकिर्दीत अशोक मामांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामुळे कलाविश्वात त्यांचा दबदबा आहे.

आजही अशोक सराफ यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. यात अशी ही बनवाबनवी, सगळीकडे बोंबाबोंब, घनचक्कर, वाजवा रे वाजवा यांसारखे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.

कसदार अभिनयशैली आणि स्वभावातील साधेपणा यामुळे प्रेक्षकांशी जोडले गेलेले मामा या कलाविश्वात नेमके कसे आले हा प्रश्न अनेकांना पडतो.

अलिकडेच झी मराठीच्या एका कार्यक्रमात अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी अशोक मामांच्या करिअरविषय़ी भाष्य केलं. अशोक सराफ यांची कलाविश्वात नेमकी एन्ट्री कशी झाली हे त्यांनी सांगितलं.

अशोक सराफ यांना त्यांच्या मामामुळे कलाविश्वात नशीब आजमावण्याची संधी मिळाली.

मुळात अशोक सराफ यांच्यामध्ये अभिनयाचे गुण असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मामाच्या कलामंदिर या संस्थेत अभिनयाचं योग्य प्रशिक्षण घेतलं आणि तेथूनच त्यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरु झाली.

अशोक सराफ यांनी अलिकडेच वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यामुळे झी मराठीने त्यांच्यासाठी एका दिमाखदार सोहळ्याचं आयोजन केलं आहे.