'माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये असेल...' समलैंगिक संबंधांवर महेश मांजरेकरांची थेट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 11:21 AM2023-07-07T11:21:42+5:302023-07-07T11:26:18+5:30

mahesh manjrekar: सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अशाच एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या लेकाविषयी भाष्य केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे महेश मांजरेकर.

मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर महेश मांजरेकरांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही त्यांचं स्थान भक्कम केलं आहे.

आज मराठीतील नामवंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. महेश मांजरेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही चर्चेत येत असतात

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अशाच एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या लेकाविषयी भाष्य केलं आहे.

"माझा मुलगा गे असला तरी मी त्याचा स्वीकार करेन", असं म्हणत त्यांनी जाहीरपणे समलैंगिक संबंधांवर भाष्य केलं.

अलिकडेच त्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना मराठी प्रेक्षक समलिंगी संबंधांवर आधारित चित्रपट पाहण्यास तयार आहेत का? असा प्रश्न विचारला.

"आपण मराठी प्रेक्षकांना कमी का लेखतो? ते समजूतदार, समंजस्य आणि पुढारलेल्या विचारांचे आहेत. आजुबाजूला, समाजात काय सुरु आहे ते त्यांना कळतं. मुळात यापूर्वीही मराठी सिनेमांमध्ये असे बरेच प्रयोग झाले आहेत. त्यामुळे अशा सिनेमांसाठी प्रेक्षक नक्कीच तयार होईल", महेश मांजरेकर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "आपण प्रत्येक नातेसंबंधांचा स्वीकार केला पाहिजे. ज्यावेळी लोक या नात्यांचा स्वीकार करत नाहीत तोपर्यंत समस्या निर्माण होत राहणार आणि त्यातूनच आत्महत्येसारख्या गोष्टी घडणार. जर आज माझा मुलगा ये मला म्हणाला की तो समलिंगी संबंधात (गे) आहे. तर, मी नक्कीच त्याचा स्वीकार करेन. हे त्याचं आयुष्य आहे, त्याची निवड आहे आणि, मला त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू द्यायचं आहे."

महेश मांजरेकर लवकरच पुराना फर्निचर या सिनेमात झळकणार आहेत. तसंच वेडाच मराठे वीर दौडले सात या सिनेमाचं दिग्दर्शन ते करत आहेत.