उर्मिला कोठारेच्या सासूबाईंना कधी पाहिलंय का? सुनबाईं इतक्याच सुंदर दिसतात महेश कोठारे यांच्या पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 07:00 AM2022-04-11T07:00:00+5:302022-04-11T07:00:01+5:30

Neelima kothare:निलिमा दिसायला उर्मिला इतक्याच सुंदर आहेत. मात्र, त्या सोशल मीडियावर फारशा सक्रीय नाहीत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानिटकर-कोठारे.

गेल्या कित्येक वर्षांमध्ये उर्मिला छोट्या पडद्यावरील वावर कमी झाला होता. मात्र, तब्बल १२ वर्षांनंतर ती तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या माध्यमातून कमबॅक करत आहे.

उर्मिला अभिनेता आदिनाथ कोठारेची पत्नी आणि महेश कोठारे यांची सून आहे.

मराठी कलाविश्वात कोठारे फॅमिलीचा कायमच दबदबा असल्याचं पाहायला मिळतं. या कुटुंबील अनेक जण कलाविश्वात सक्रीय आहेत.

आदिनाथ, उर्मिला, महेश कोठारे यांच्याविषयी तर साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, आज आपण कोठारे कुटुंबाच्या लेडी बॉसविषयी जाणून घेऊयात. अर्थात महेश कोठारे यांच्या पत्नीविषयी.

महेश कोठारे यांच्या पत्नीचं नाव निलिमा कोठारे असं आहे

निलिमा दिसायला उर्मिला इतक्याच सुंदर आहेत. मात्र, त्या सोशल मीडियावर फारशा सक्रीय नाहीत.

अनेकदा उर्मिला, महेश कोठारे हे निलिमा यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असतात.

महेश कोठारे हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह एकत्र राहतात. यात त्यांचे आई-वडील, पत्नी, मुलगा, सून आणि नात जिजा यांचा समावेश आहे.