Photos: सिनेसृष्टीपासून कोसोदूर आहे स्पृहा जोशीचा नवरा; जाणून घ्या त्याच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 07:00 AM2022-05-02T07:00:00+5:302022-05-02T07:00:01+5:30

Spruha Joshi: स्पृहा-वरदचं लव्ह मॅरेज असून त्यांनी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि कवयित्री म्हणजे स्पृहा जोशी.

अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेल्या स्पृहाने बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

उत्तम अभिनय आणि कविता सादर करण्याच्या जोरावर स्पृहाने प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

स्पृहा सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.

स्पृहा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनन्या, नेव्हर माईंड, बायस्कोप, लहानपण देगा देवा, नांदी, समुद्र यासारख्या नाटकांमध्ये काम केले आहे.

अग्निहोत्र, आभाळमाया, उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, एक हा असा धागा सुखाचा, दे धमाल, बॉम्बे लायर्स, सत्यमेव जयते, सुपस्टार, सुर नवा ध्यास नवा यासारख्या मालिका व शोमध्ये देखील ती झळकली आहे.

स्पृहाचं लग्न झालं असून तिच्या नवऱ्याचं नाव वरद लघाटे असं आहे.

स्पृहा-वरदचं लव्ह मॅरेज असून त्यांनी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली.

वरद सिनेसृष्टीशी संबंधित नसून तो एका वेगळ्याच क्षेत्रात कार्यरत आहे.

वरद सुरुवातीच्या काळात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होता असं म्हटलं जातं.

काही वर्ष पत्रकारिता केल्यानंतर त्याने हे क्षेत्र सोडून मार्केटिंग क्षेत्रात पदार्पण केलं.