तुम्हीही Tea च्या प्रेमात आहात? प्राजक्ता माळी काय म्हणाली वाचा, सांगते- "चहा असेल तर तो..."

By देवेंद्र जाधव | Updated: September 3, 2025 15:48 IST2025-09-03T15:30:55+5:302025-09-03T15:48:17+5:30

प्राजक्ता माळीने चहा आणि कॉफीबद्दल असं वक्तव्य केलं आहे जे ऐकून तुमच्या भुवया उंचावतील? काय म्हणाली अभिनेत्री?

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.

प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करताना दिसतेय. प्राजक्ताच्या खुमासदार सूत्रसंचालनाने हास्यजत्रा शोला आणखी रंगत येते.

प्राजक्ता माळी विविध विषयांवर तिचं मत व्यक्त करताना दिसते. अशातच चहाप्रेमीना आनंद होईल असं खास वक्तव्य प्राजक्ताने केलं आहे. काय म्हणाली अभिनेत्री?

प्राजक्ता माळी एका मुलाखतीत म्हणाली होती की, ''चहा असेल तर तो आलं टाकलेला मसाला चहा पाहिजे. आणि कॉफी असेल तर ती अशी स्ट्राँग कॉफी पाहिजे. ते नसेल तर मी दोन्ही पिणार नाही. आणि ते असेल तर दोन्ही स्ट्राँग.''

अशाप्रकारे प्राजक्ता माळीने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. प्राजक्ता माळीच्या या वक्तव्यावर अनेक चहा आणि कॉफीप्रेमींनी समर्थन दर्शवलं आहे

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर २०२४ मध्ये आलेल्या फुलवंती सिनेमात प्राजक्ता माळी झळकली. या सिनेमाची निर्मिती सुद्धा प्राजक्ता माळीनेच केली होती

सध्या प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताच्या नवीन सिनेमाबद्दल अजून कोणतीही अपडेट समोर आली नाहीये.