'या' मराठी अभिनेत्री युट्यूबवरही आहेत फेमस; जाणून घ्या त्यांच्या युट्यूब चॅनल्सची नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:02 PM2022-03-10T13:02:49+5:302022-03-10T13:10:03+5:30

Marathi actress: सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येतात.

सध्याच्या काळात प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. यात खासकरुन सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येतात. त्यामुळेच युट्यूबवर राज्य करणाऱ्या मराठी अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात.

स्पृहा जोशी - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, कवियित्री, निवेदिका अशा विविध भूमिका पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. यात गेल्या २-३ वर्षांपासून ती युट्यूब चॅनेलही चालवते. स्पृहा जोशी याच नावाने तिचं युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर ती तिच्या कविता सादर करते, कधी कलाविश्वातील गमतीजमती सांगते. स्पृहाचे 81. 2k फॉलोअर्स आहेत. तर तिने १४८ व्हिडीओ शेअर केले आहेत.

मधुराणी गोखले-प्रभुलकर - आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधतीदेखील युट्यूबवर सक्रीय आहे. तिचं मिरॅकल्स सरस्वती या नावाने युट्यूब चॅनेल आहे. यात ती 'कवितेचं पान' या नावाने दिग्गज कवींच्या कवितांचं वाचनही करत असते. तिच्या चॅनेल्सचे 49.5k फॉलोअर्स आहेत.

तितीक्षा, खुशबू तावडे आणि गौरी नलावडे - मराठी कलाविश्वातील या तीन अभिनेत्रींचं मिळून एक युट्यूब चॅनेल आहे. Pocket Full of Stories असं या चॅनेलचं नाव आहे. या चॅनेलमध्ये या तिघी अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

मधुरा वेलणकर-साटम - अनेक मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री म्हणजे मधुरा वेलणकर. तिचंदेखील स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे. मधुरा वेलणकर-साटम याच नावाने तिचं चॅनेल आहे.

सुलेखा तळवलकर - नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सुलेखा तळवलकरदेखील युट्यूब चॅनेल चालवते. तिच्याच नावाने असलेल्या या चॅनेलवर ती दिल के करीब या अंतर्गंत कलाविश्वातील सेलिब्रिटींच्या खास मुलाखती घेत असते. या चॅनेलवर आतापर्यंत 90.7k फॉलोअर्स आहेत.

रुपाली भोसले - आई कुठे काय करते या मालिकेतली संजना म्हणजे रुपाली भोसले. या चॅनेलवर ती अनेकदा काही हटके पदार्थ आणि रेसिपीज चाहत्यांसोबत शेअर करत असते.

उर्मिला निंबाळकर - उर्मिला निंबाळकर हे नाव कोणत्याही युट्यूब युजरसाठी नवीन नाही. उर्मिला अभिनेत्री असण्यासोबतच प्रसिद्ध युट्यूबर आहे. ती फॅशन, लाइफस्टाइल, ट्रॅव्हल अशा वेगवेगळ्या विषयावर अनेक व्हिडीओ शेअर करत असते.