लाईमलाईटपासून कोसोदूर आहे अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ; 'या' क्षेत्रात निर्माण केलाय दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:18 PM2023-03-01T12:18:38+5:302023-03-01T12:25:38+5:30

Ashok saraf: अशोक सराफ यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, त्यांचा सख्खा भाऊ या क्षेत्रापासून कोसोदूर आहे.

अशोक सराफ हे नाव मराठीसह हिंदी कलाविश्वातही चांगलंच परिचयाचं आहे. उत्तम अभिनयशैली आणि विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे अशोक मामांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

गेल्या कित्येक काळापासून अशोक सराफ या नावाचा मराठी कलाविश्वात दबदबा आहे.

आजही त्यांची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. लहानग्यांपासून थोरांपर्यंत त्यांच्या अभिनयाची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं.

धुमधडाका, सगळीकडे बोंबाबोंब, वाजवा रे वाजवा, चौकट राजा अशा कितीतरी चित्रपटातून त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.

अशोक सराफ यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी निवेदिता सराफ यादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.

मध्यंतरी कोण होणार करोडपतीच्या मंच्यावर अशोक सराफ यांच्या भावाने हजेरी लावली होती. त्यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या भावाला सगळ्यांनी पाहिलं.

अशोक सराफ यांच्या धाकट्या भावाचं नाव सुभाष सराफ असं असून पहिल्यांदाच ही भावंडं एका मंचावर एकत्र पाहायला मिळाली. सुभाष सराफ हे व्यवसायाने सीए असून ते गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईत प्रॅक्टिस करत आहेत.