विकी कौशलच्या 'छावा'मध्ये भाव खाऊन गेला संतोष जुवेकर, मराठी कलाकारांची सिनेमात हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:19 IST2025-02-14T16:59:58+5:302025-02-14T17:19:18+5:30
छावामध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते. या सिनेमात संतोष जुवेकर भाव खाऊन गेला आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. तो विकी कौशलचा छावा सिनेमा प्रदर्शित झालाय.
या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. त्याने औरंगजेबाची भूमिका लिलया पेलली आहे.
छावामध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते. या सिनेमात संतोष जुवेकर भाव खाऊन गेला आहे.
संतोष जुवेकरने छावामध्ये रायाजीची भूमिका साकारली आहे. मर्द मराठा मावळा म्हणून संतोष छाप पाडतो.
या सिनेमात नीलकांती पाटेकरही आहेत. त्यांनी धाराऊ ही भूमिका साकारली आहे.
सिनेमात शुभंकर एकबोटेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याने धनाजी ही भूमिका साकारली आहे.
सारंग साठ्ये गणोजी यांच्या भूमिकेत आहे.
आणि सुव्रत जोशीने कान्हाजीची भूमिका साकारली आहे.
अभिनेता मनोज कोल्हटकरदेखील छावामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
तर आस्ताद काळेने सूर्याही भूमिका साकारली आहे.