प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहराशी आहे खास नातं, वाचून तुम्हालाही होईल आनंद

By देवेंद्र जाधव | Updated: June 27, 2025 16:26 IST2025-06-27T15:34:02+5:302025-06-27T16:26:29+5:30

प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहराशी खास कनेक्शन आहे. प्राजक्ताच्या अनेक फॅन्सना याविषयी माहिती नसेल. त्यामुळे जाणून घ्या

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.

प्राजक्ता माळीचं मनमोकळं बोलणं, दिलखुलास हसणं अशा सर्व गोष्टींसाठी चाहते तिच्यावर मनापासून प्रेम करतात. प्राजक्ता माळीचं पंढरपूरसोबत एक खास कनेक्शन आहे. तुम्हाला माहितीये?

प्राजक्ता माळीचं आजोळ पंढरपूरमध्ये आहे. पंढरपूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यात भाळवणी हे गाव आहे. हेच प्राजक्ताचं आजोळ आहे.

प्राजक्ता शूटिंगमधून आणि व्यस्त दिनक्रमातून आवर्जुन वेळ काढत आजोळी भेट देत असते. पंढरपूर तालुक्यातील नायकाची भाळवणी हे गाव कावड यात्रेसाठी प्रसिद्ध आहे

प्राजक्ता दरवर्षी या कावड यात्रेला सहकुटुंब सहपरिवार हजेरी लावत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर या यात्रेचे फोटो शेअर करताना दिसते.

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करताना दिसते. प्राजक्ताच्या खुमासदार शैलीने या शोला रंगत निर्माण होते.

प्राजक्ता माळी २०२४ मध्ये फुलवंती सिनेमा प्रमुख भूमिका साकारली. याशिवाय प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चिकी चिकी बुबुम बुम सिनेमात प्राजक्ता झळकली. प्राजक्ताच्या नवीन सिनेमाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.