'खुबसुरत तो बहुत हैं हम,मगर.. 'अश्विनी महांगडेचं नवं फोटोशूट पाहिलतं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:11 IST2022-04-06T13:04:07+5:302022-04-06T13:11:30+5:30
ashwini mahangade: सध्या अश्विनी आई कुठे काय करते या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही विशेष पसंती मिळत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे.
उत्तम अभिनयामुळे अश्विनी कायम चर्चेत असते.
ऐतिहासिक मालिकांसह अश्विनीने कौटुंबिक मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे ती कायम नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते.
सध्या अश्विनी आई कुठे काय करते या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही विशेष पसंती मिळत आहे.
अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
अलिकडेच अश्विनीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटपैकी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या फोटोपेक्षा तिने त्यावर दिलेल्या कॅप्शनची सर्वात जास्त चर्चा होत आहे.
अश्विनीने फोटोशूट केलेल्या फोटोंपैकी हा सुंदर फोटो. या फोटोला तिने 'खुबसुरत तो बहुत हैं हम,मगर सिर्फ चेहरे से', असं कॅप्शन दिलं आहे.