यत्किंचितही बदलली नाहीये 'बनवाबनवी'ची माधुरी; वयाच्या पन्नाशीतही दिसते पूर्वीसारखीच beautiful & glamorous
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 11:44 IST2022-06-27T11:40:47+5:302022-06-27T11:44:37+5:30
Ashvini bhave: अश्विनी भावे यांच्यात जरासाही बदल झाला नसून त्या पूर्वी दिसायच्या तितक्याच सुंदर आजही दिसतात.

मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे अशी ही बनवाबनवी. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज कित्येक वर्ष लोटले तरी त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ आणि अश्विनी भावे असे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकले.
आजही या कलाकारांचा मराठी कलाविश्वात दबदबा असल्याचं पाहायला मिळतं. यात अभिनेत्री अश्विनी भावे यांची सोशल मीडियावर वरचेवर चर्चा रंगत असते.
कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या अश्विनी भावे सध्या विदेशात स्थायिक आहेत. मात्र, आजही त्यांची भारतासोबत आणि कलाविश्वासोबतची नाळ जोडलेली आहे.
अश्विनी भावे सोशल मीडियावर सक्रीय असून त्या कायम विदेशातील नवनवीन गोष्टींची वा त्यांच्या बागेतील फळझाडांविषय़ीची माहिती चाहत्यांना देत असतात.
आज अश्विनी यांनी वयाची ५० गाठली आहे. मात्र, त्यांचं सौंदर्य आजही २०-२२ वर्षांच्या तरुणींना लाजवेल असंच आहे.
अलिकडेच त्यांनी एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अश्विनी भावे यांच्यात जरासाही बदल झाला नसून त्या पूर्वी दिसायच्या तितक्याच सुंदर आजही दिसतात.
अश्विनी भावे यांचा प्रत्येक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अश्विनी भावे यांनी पतीसोबत शेअर केलेला फोटो