"हँसती रहे, तू हँसती रहे...", 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी प्रभुलकरचं सुंदर फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:46 IST2025-02-03T13:36:48+5:302025-02-03T13:46:23+5:30

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचं नवं फोटोशूट चर्चेत.

अनेकदा कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयासह सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

तसेच कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण किंवा आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती चाहत्यांसोबत शेअर करतात.

अशातच 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरलेत.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हे मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेलं नाव आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

दरम्यान, मधुराणीने सोशल मीडियावर नुकतेच शेअर केलेले फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

काळ्या रंगाची साडी त्यावर साजेसे ऑक्साईड दागिने परिधान करुन तिने सुंदर असा लूक केला आहे. तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

त्याचबरोबर या फोटोंमधील मधुराणीचा मनमोहक अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे.