Kashish Kapoor : "माझ्याकडे दुर्लक्ष केलं, हा माझा अपमान"; सलमान खानला धडा शिकवणार कशिश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:21 IST2025-01-01T13:03:54+5:302025-01-01T13:21:36+5:30

Kashish Kapoor And Salman Khan : कशिशनेही सलमानसमोर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण सलमान काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता

वीकेंड का वारमध्ये कशिश कपूर आणि अविनाश मिश्रा यांच्यातील फ्लर्टिंगचा मुद्दा गाजला होता. सलमानने अभिनेत्रीवर अविनाशसोबत अँगल क्रिएट केल्याचा आरोप केला होता.

कशिशनेही सलमानसमोर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण सलमान काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने कशिशची बाजू ऐकली नाही.

यामुळे निराश झालेल्या अभिनेत्रीने सलमानवर संतप्त प्रतिक्रिया दिली. कशिशची ही कृती सलमानला आवडली नाही. तो स्पष्टपणे म्हणाला - माझ्यासोबत असं करू नकोस.

कशिशने तेव्हा सलमानसमोर सॉरी म्हटलं होतं. मात्र नंतर चाहत पांडेशी बोलताना कशिशला राग अनावर झाला.

अभिनेत्रीने तिचा राग सलमानवर काढला. कशिश म्हणाली - "मी सॉरी म्हणून गप्प बसणार नाही. कारण मी हे केलं नाही तर मी ते स्वीकारणार देखील नाही."

"ही छोटी बाब नव्हती. मी कशाबद्दल बोलत आहे हे तुम्हाला समजत नसेल तर मी काय आहे हे तुम्हाला समजणार नाही."

"शेवटी मी म्हणाले, सर, फक्त एक सेकंद, मला समजतंय की तुम्ही माझं ऐकत आहात, परंतु तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत आहात. ते माझ्यासाठी खूप अपमानास्पद आहे."

"मला वाईट वाटलं. मी पण एक स्पर्धक आहे. मी नॅशनल टीव्हीवर आहे. माझी चूक नसेल तर मी थोडं ऐकून घेणार नाही."

"माझ्या वडिलांना आणि आईला माहित असले पाहिजे की मी गैरवर्तन केलेलं नाही. या चुकीच्या गोष्टीबद्दल माझ्याकडे बोट दाखवण्यात आलं आहे. आरोप चुकीचा आहे. त्यामुळे मी असाच माझा बचाव करीन."