‘नागिन’ फेम करिश्मा तन्नाच्या फोटोंचा धुमाकूळ, बोल्ड लूक पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 02:43 PM2020-02-02T14:43:12+5:302020-02-02T14:47:52+5:30

टीव्ही मालिका नागिन 3 फेम अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे खूप चर्चेत आहे.

करिश्माने बिकिनीतील काही फोटो नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

मेजर मिसिंग या कॅप्शनसह करिश्माने हे फोटो शेअर केलेत

करिश्माच्या या फोटोंवर तिचा बॉयफ्रेन्ड पर्ल पुरीनेही कमेंट केली आहे. त्याने करिश्माच्या या बिकिनी लुकवर हॉट इमोजी पोस्ट केल्या आहेत.

याशिवाय करिश्माची बेस्ट फ्रेंड आणि निर्माती एकता कपूरने सुद्धा कमेंट केली आहे. तू नक्की काय मिस करत आहे असे तिने कमेंट करत विचारले आहे.

करिश्मा लवकरच ‘खतरों के खिलाडी’ या दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या रिअलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याआधी ती एकता कपूरच्या नागिन 3 या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिनं सुरुवातीला नागिन रुहीची भूमिका साकारली होती. त्यानंतर मालिकेच्या शेवटी ती खलनायकी भूमिकेत दिसली होती.