"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 23:06 IST2025-07-29T22:26:56+5:302025-07-29T23:06:09+5:30

Jethalal Babitaji Chemistry in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील जेठालाल आणि बबिताजी यांचं नातं खूपच मजेशीर आहे

Jethalal Babitaji Chemistry in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: - Marathi News | Jethalal Babitaji Chemistry in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Latest filmy Photos at Lokmat.com

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीवर राज्य करत आहे. या शो मधील प्रत्येक पात्र घराघरात प्रसिद्ध आहे. या शोमध्ये जेठालाल आणि बबितीजींची केमिस्ट्री चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरते.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शो ला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकतेच या शो चे मुख्य पात्र असलेले जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी बबिताजी सोबतच्या त्यांच्या केमिस्ट्रीबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या.

या मालिकेतील दोघांचीही भूमिका मजेदार आहे. जेठालालला बबिताजी आवडतात, पण जेठालालच्या भावना मालिकेत कधीही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेल्या नाहीत. म्हणूनच चाहत्यांना ही जोडी आवडते.

जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "आम्ही अहमदाबादला शूटिंगसाठी एका वृद्धाश्रमात गेलो होतो. तिथे बरेच लोक होते. त्यांनी आमच्या मालिकेचे आणि माझे कौतुक केले."

"वृद्धाश्रमातील लोकांनी सांगितले की त्यांना माझा अभिनय आवडतो. तसेच माझी आणि बबिताजी यांची केमिस्ट्रीही त्यांना खूप भावते. मी बबिताजींशी ज्या पद्धतीने बोलतो, ते त्या साऱ्या लोकांना खूप आवडते."

"जर तुम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आमचे नाते खूप वेगळे आहे आणि लोकही ते हळूहळू स्वीकारत आहेत. एक अभिनेता आणि पटकथा लेखक म्हणून आम्ही योग्य दिशेने पुढे जात आहोत."

"शूटिंगच्या वेळी मी नेहमीच मर्यादा जाणून असतो. आमच्या केमिस्ट्रीमध्ये अश्लीलता आणि निरागसता यांच्यातील पातळ रेषा कधीही ओलांडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करतो," असे दिलीप जोशी यांनी स्पष्ट केले.