Indian Idol 12 फेम सायली कांबळेचे बँकॉकमधील फोटोशूट आलं चर्चेत, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 18:12 IST2022-08-26T18:07:45+5:302022-08-26T18:12:52+5:30

Sayali Kamble: सायली कांबळे सध्या बँकॉकमध्ये असून तिने तिथले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

‘इंडियन आयडल १२’ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayli Kamble)ने आपल्या सुरेल स्वराने रसिकांच्या मनात घर केले आहे.

Indian Idol 12 शोमधून सायली कांबळे(Sayali Kamble) हिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

इंडियन आयडल १२ या शोनंतर सायली कांबळेच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही चांगलीच वाढ झाली आहे.

सायली कांबळे सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.

सायली कांबळे सध्या बँकॉकमध्ये असून ती लाइव्ह कॉन्सर्टसाठी तिथे गेली आहे.

सायली कांबळे सोबत तिथे आशिष कुलकर्णी आणि रोहित राऊतदेखील आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळत आहे.

सायली कांबळे हिने बँकॉकमध्ये फोटोशूट केले असून ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सायली कांबळेचे बँकॉकमधील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

आजच्या घडीला सायलीचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.