कसं पडलं करिश्मा कपूरला 'लोलो' हे नाव? भन्नाट किस्सा वाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 02:02 PM2024-05-09T14:02:22+5:302024-05-09T14:37:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी करिष्मा आतासुद्धा तिच्या अनोख्या अंदाजानं सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळवते.

करिश्मा ही ही अभिनेता राजकपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर यांची मुलगी आहे. कपूर कुटुंबाची लाडकी असलेल्या करिश्माचं टोपणनाव 'लोलो' असं आहे.

करिश्मा कपूरला हे टोपणनाव 'लोलो' कसे पडलं किंवा तिला कोणी दिले हे तुम्हाला माहितेय का? तर ते आपण जाणून घेऊया.

करिश्मा कपूरनेच एका मुलाखतीमध्यो या नावामागची कहाणी सांगितली होती.

करिश्माने सांगितले की, तिची आई बबिता कपूर जीना लोलोब्रिगिडाची (इटालियन अभिनेत्री) खूप मोठी फॅन होती. शिवाय माझी आई ही सींधी आहे. सिंधी लोकांच्या घरी ‘मिठी लोलो’ नावाचा पदार्थ बनतो. गोड रोटी किंवा पराठा असतो, ज्याला लोलो किंवा लोली म्हणतात. त्यामुळे मला ‘लोलो’ हे नाव पडले.

करिश्माने सांगितले की कपूर कुटुंबात डब्बू, चिंटू आणि चिपू अशी मजेदार टोपणनावांची परंपरा आहे. करिश्माची बहिण करिना कपूरलाही टोपणनाव आहे. तिला बेबो असं म्हणतात, हे तर सर्वांनाच ठावूक आहे.

करिश्मा बॉलिवूडमध्ये कमी सक्रिय असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

करिश्माने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या 'प्रेम कैदी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कपूर कुटुंबाची लेक मोठ्या पडद्यावर आल्यानंतर चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिलं होतं.

कपूर घराण्यातील मुली सिनेमात काम करत नाहीत हा समज तिने मोडून काढला होता. तिच्या पावलावर पाऊल ठेवत नंतर बहीण करीना कपूरही सिनेसृष्टीत आली.

करिश्मा आणि करिना कपूर दोघीही बहिणी बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्री आहेत. करीना अजूनही सक्रीय आहे तर करिश्मा काही काळाच्या ब्रेकनंतर पुन्हा स्क्रीनवर आली आहे. नुकतेच करिश्मा 'मर्डर मुबारक' सिनेमामध्ये झळकली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं.