अभी तो मैं जवान हूं! 'ही' 70 वर्षीय सुपरमॉडेल आहे 4 नातवंडांची आजी; फिटनेस पाहून म्हणाल अरे व्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 04:18 PM2023-01-07T16:18:35+5:302023-01-07T16:29:41+5:30

Beverly Johnson : नव्या आव्हानात्मक प्रवासाची सुरुवात बवर्लीसाठी कठीण होती पण तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केलात तर ते साध्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हॉलीवूडची सुपरमॉडेल बवर्ली जॉन्सन हिने हे सिद्ध केलं आहे. बवर्ली जॉन्सन पोहण्यात पारंगत होती. तिने कायद्याचेही शिक्षण घेतले, पण कदाचित त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं.

70 च्या दशकात बवर्लीने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. त्या काळात फॅशन इंडस्ट्रीत फक्त फेयर स्किन आणि ब्लू आइज असलेल्या मॉडेल्सनाच प्राधान्य दिले जात असे. या नव्या आव्हानात्मक प्रवासाची सुरुवात बवर्लीसाठी कठीण होती पण तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

अनेक फॅशन डिझायनर्सनी तिला नाकारले आणि म्हटले की तू स्वत:ला काय समजतेस? पण बवर्लीने कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. आपल्या वेळेचा योग्य वापर केला आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले. बवर्लीने काही नियोजन केले. नेटवर्क एजन्सी बदलली, तिची टीम बदलली.

आज बवर्ली 70 वर्षांची झाली आहे. इंडस्ट्रीसोबत जोडली गेली आहे. ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. फिटनेस आणि टोन्ड फिगर मेनटेन बाबतीत ती सर्वोत्कृष्टांना टक्कर देते. ती दिवसाची सुरुवात मेडिटेशन, क्रॉस ट्रेनिंग आणि योगाने करते. यानंतर, नाश्त्यासाठी फक्त कोमट लिंबूपाणी आणि स्ट्रॉबेरी खाते.

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात मीट आणि उकडलेल्या भाज्या खाते. तिला काहीतरी गोड खावेसे वाटत असेल तर ती नेहमी योगर्ट खाण्यास प्राधान्य देते. याशिवाय, बवर्ली एक दिवस चीट डे देखील ठेवते, ज्यामध्ये ती बटर पॉपकॉर्नने तिची इच्छा पूर्ण करते.

वयाच्या 70 व्या वर्षीही बवर्लीची स्किन खूप टाइट दिसते. याचे कारण स्किन ट्रिटमेंट आहे. शस्त्रक्रिया करून तिने स्वतःची त्वचा मेनटेन आहे. ऑक्टोबर 1952 रोजी जन्मलेली, बवर्ली ऐन जॉन्सन ही एक अमेरिकन मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि बिझनेस वुमन आहे.

1974 मध्ये, अमेरिकन व्होगच्या मुखपृष्ठावर दिसणारी ती पहिली आफ्रिकन-अमेरिकन मॉडेल बनली. 1974 साली फ्रेंच एले मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणारी ती पहिली कृष्णवर्णीय महिला होती.

बवर्लीने दोनदा लग्न केलं. 1971 मध्ये तिने रिअल इस्टेट एजंट बिली पोर्टरसोबत पहिलं लग्न केलं. त्यावेळी ती 19 वर्षांची होती. तथापि, लग्नाच्या तीन वर्षानंतर, बवर्ली बिलीपासून घटस्फोट घेतला.

यानंतर वयाच्या 25 व्या वर्षी, बवर्लीने दुसरे लग्न केलं. संगीत निर्माता डॅनी सिम्सपासून तिला अनन्सा नावाची मुलगी आहे. डॅनी आणि बवर्ली दोन वर्षांनंतर वेगळे झाले. बवर्लीचे दुसरे लग्नही यशस्वी झाले नाही.

1995 मध्ये, बवर्लीने अभिनेता ख्रिस नॉर्थला पाच वर्षे डेट केले. नंतर बेव्हरलीने ख्रिसवर घरगुती हिंसाचार आणि अत्याचाराचा आरोप केला. बवर्ली ख्रिसविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. बवर्लीचे मुलगी अनन्सासोबत खूप चांगले संबंध आहेत.

अनन्साबद्दल सांगायचे तर, 2010 मध्ये अनन्साने डेव्हिड पॅटरसनसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि दोन मुलगे होते. पण 2017 मध्ये दोघेही वेगळे झाले. यानंतर अनन्सा बॉयफ्रेंड मॅट बार्न्ससोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागली, ज्याच्यासोबत तिला एक मुलगा आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.