Anant Ambani-Radhika Merchant wedding : किम कार्दशियनचं देसी स्टाईलमध्ये केलं स्वागत, पहिल्यांदाच आली भारतात, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:10 IST2024-07-12T14:10:39+5:302024-07-12T14:10:39+5:30

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नात सहभागी होणारे परदेशी पाहुणे सर्वात जास्त चर्चेत आहेत. त्यापैकी एक किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन काल रात्री मुंबईत दाखल झाल्या आहेत.

दोघीही गुरुवारी रात्री उशिरा कलिना विमानतळावर दिसल्या. या दोघांची झलक पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

किम पहिल्यांदाच भारतात पोहोचली आहे आणि तिच्यासाठी हा पहिला प्रवास संस्मरणीय ठरला आहे.

किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन यांचं देसी शैलीत स्वागत करण्यात आलं.

कपाळी टिळा, आरती आणि शाल देत भारतीय पद्धतीत आदरातिथ्य केल्याचं दिसून आलं.

याचे फोटो खुद्द किम कार्दशियन हिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कार्दशियन बहिणी आज 12 जुलै रोजी होणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातील खास पाहुण्या आहेत.

अनंत आणि राधिकाच्या लग्नात सहभागी होऊन किम कार्दशियन या सोहळ्याला चार चाँद लावत आहे.

किम कार्दशियन जगभरात प्रसिद्ध आहे. जगातील टॉप सेलिब्रिटींमध्ये तिचा समावेश होतो. किम कार्दशियन कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

















