'तुम्हाला कधीच त्रास देणार नाही'; चाहत्याने केली गौतमीकडे खास मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 11:59 AM2023-05-12T11:59:18+5:302023-05-12T12:03:22+5:30

Gautami patil: गौतमीच्या या पोस्टवर चाहत्याने केलेल्या कमेंटची सध्या नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा रंगली आहे.

गौतमी पाटील हे नाव सध्या कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन राहिलेलं नाही. आपल्या हटके लावणीसाठी ती सध्या चर्चेत आले.

गेल्या काही काळात गौतमीची क्रेझ तुफान वाढली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दररोज तिची या ना त्या कारणाने चर्चा रंगत असते.

गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आयोजक मोठी रक्कम मोजतात.

परंतु, बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात काही ना काही विचित्र प्रकार घडत असतात. ज्यामुळे ती चर्चेत येते.

गौतमीचा आजच्या घडीला मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत असतो.

अलिकडेच गौतमीने इन्स्टाग्रामवर एका गाण्याचं रिल शेअर केलं. हे रिल पाहून एका चाहत्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली आहे.

"गौतमी पाटील तुम्ही खूप सुंदर आहात. मला मनापासून आवडता. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्या प्रत्येक अडचणीत मी तुम्हाला साथ देईन. मला समजून घ्या. तुम्हाला हवा तसा जोडीदार आहे मी. तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. प्लीज विनंती आहे मला रिप्लाय दे", अशी कमेंट करत एका चाहत्याने सर्वांसमोर तिला लग्नाची मागणी घातली आहे.

गौतमीच्या या पोस्टवर चाहत्याने केलेल्या कमेंटची सध्या नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा रंगली आहे.

गौतमी आज जरी लोकप्रिय लावणी डान्सर असली तरीदेखील एकेकाळी तिने बराच स्ट्रगल केला आहे.