Photos:पाहा खऱ्या आयुष्यात कशी दिसते जेठालालची लेक; जाणून घ्या नियतीविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 15:57 IST2021-12-10T15:49:57+5:302021-12-10T15:57:13+5:30

Niyati joshi: दिलीप जोशींचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, त्यांची दोन्ही मुलं आज स्टारडम, झगमगाट या सगळ्यापासून लांब आहेत.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (tarak mehta ka ulta chashma) या मालिकेतील सर्वाधिक गाजलेलं पात्र म्हणजे जेठालाल. ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी यांनी साकारली आहे.

सध्या सोशल मीडियावर दिलीप जोशी चांगलेच ट्रेंड होत असून त्यांचं प्रमोशन झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रमोशनमध्ये दिलीप जोशी यांनी आता एका नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे.

दिलीप जोशी यांच्या लेकीचं नियतीचं ११ डिसेंबर रोजी लग्न होणार आहे. त्यामुळे आता पडद्यावरील जेठालाल खऱ्या आयुष्यात सासऱ्यांची भूमिका पार पाडणार आहे.

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये नियती जोशीचा लग्नसोहळा होणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर दिलीप जोशींच्या लेकीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दिलीप जोशी यांना दोन मुलं असून त्यांच्या मुलाचं नाव ऋत्विक आहे. तर मुलीचं नाव नियती आहे.

सध्या सोशल मीडियावर दिलीप जोशींच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये नियती तिच्या फॅमिलीसोबत डिनर करतांना दिसत आहे.

दिलीप जोशींचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, त्यांची दोन्ही मुलं आज स्टारडम, झगमगाट या सगळ्यापासून लांब आहेत.

दिलीप जोशी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब व्हेकेशन एन्जॉय करतांना ( फोटो सौजन्य: social media)