तेरी झुकी नज़र, तेरी हर अदा... धनश्री वर्माच्या सौंदर्यापुढे चाहते 'क्लीन बोल्ड', पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 04:14 PM2024-04-16T16:14:29+5:302024-04-16T16:42:45+5:30

Dhanashree Verma, Yuzvendra Chahal Wife Photos: युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री त्याला चीअर करण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये हजर असते

Dhanashree Verma, Yuzvendra Chahal Wife Photos: भारतात IPL हा क्रिकेटचा उत्सव सुरु आहे. या उत्सवाला अनेक जण ग्लॅमरचा तडका लावतात.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही त्यापैकीच एक. सोशल मीडिया असो किंवा क्रिकेटचे स्टेडियम, धनश्रीच्या लूककडे साऱ्यांच्याच नजरा लागलेल्या असतात.

युजवेंद्र चहल राजस्थानच्या संघात आहे. त्याला आणि त्याच्या संघाला चीअर करण्यासाठी धनश्री नेहमीच सज्ज असते.

राजस्थानच्या संघासोबत आणि पतीसोबत धनश्रीही अनेकदा विविध शहरांमध्ये प्रवास करते आणि चहलला सपोर्ट करताना दिसते.

युजवेंद्र चहलचा राजस्थान रॉयल्स आणि श्रेयस अय्यरचा कोलकाता नाइट रायडर्स हे संघ आज आमनेसामने असणार आहेत.

धनश्रीदेखील या सामन्यात राजस्थान आणि चहलचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियममध्ये हजर असणार असेल अशी चाहत्यांना आशा आहे.

या सामन्याआधी तिने काही खास फोटो सोशल मीडियावर आपल्या अधिकृत इन्स्टा पेजवर पोस्ट केले आहेत.

धनश्री वर्माने इन्स्टा पोस्टमध्ये जे फोटो पोस्ट केले आहेत, त्यात झेब्रा प्रिंट थ्री पीस वेस्टर्न ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.