"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 02:40 PM2024-05-25T14:40:49+5:302024-05-25T14:48:25+5:30

Juhi Parmar : बऱ्याच वर्षांनंतर जुही परमारने तिला आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे.

'कुमकुम - एक प्यारा सा बंधन' या मालिकेत 'कुमकुम'च्या भूमिकेतून जुही परमारला खूप प्रेम मिळाले. जवळपास ७ वर्षे चाललेल्या या मालिकेने अभिनेत्रीला घराघरात प्रसिद्ध केले.

प्रत्येक घरातील आईचे एकच स्वप्न होते की आपली सून हुबेहुब 'कुमकुम' सारखी असेल. अलीकडेच जुहीने इंडस्ट्रीत तिला आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला, ज्याचा तिला वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी सामना करावा लागला होता.

बिकिनी घाल आणि कॉम्प्रोमाइज कर... या शब्दांनी जुही परमारची रात्रीची झोप उडवून दिली होती. पण, तिचा स्वतःवर विश्वास होता. अनेक वर्षांनंतर तिने कास्टिंग काउचचा खुलासा केला.

अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. २०२३ मध्ये 'ये मेरी फॅमिली' या वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. लेटेस्ट मुलाखतीत, तिने वयाच्या १७व्या वर्षी कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासा केला.

Hautterflyला दिलेल्या मुलाखतीत तिने ही गोष्ट शेअर केली. तिने सांगितले की जेव्हा ती १८ वर्षांची होती तेव्हा एका चॅनेलच्या प्रमुखाने तिला एक म्युझिक अल्बम शूट करण्याची ऑफर दिली होती.

अभिनेत्रीने सांगितले की, चॅनेलच्या प्रमुखाने तिला कॅमेरामध्ये फक्त बिकिनी घालण्यास सांगितले. हे ऐकून अभिनेत्री रागाने लाल झाली आणि तिने ऑफर नाकारली.

जुहीने सांगितले की, चॅनेलच्या प्रमुखाने तिला सांगितले होते, 'कॉम्प्रोमाइज' नावाचा एक शब्द देखील आहे. सिनेइंडस्ट्रीत तडजोड करावी लागते, हे सांगितले होते. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला वाटते की तुम्ही येथे टिकून राहू शकाल?

हे ऐकून जुहीने चॅनेलच्या प्रमुखाला उत्तर दिले की, तिच्या तडजोडीचे कारण म्हणजे ती आनंदाने घरी परतणार आहे. अभिनेत्रीने सांगितले की, या घटनेच्या २ वर्षांनंतर, जेव्हा ती गाडी चालवत होती. त्यानंतर हा चॅनेल प्रमुख त्यांच्या कार्यालयाबाहेर दिसला. मग तिने गाडी थांबवली आणि चॅनेल हेडला म्हणाली की 'सर, मी सुद्धा तडजोड केली नाही आणि इंडस्ट्रीत खूप चांगले टिकून आहे. ही गाडी पण माझ्याच पैशाची आहे.

जुहीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने २००९ मध्ये अभिनेता सचिन श्रॉफसोबत लग्न केले. पण लग्नानंतर काही वर्षांनी हे नाते तुटले. २०१८ मध्ये दोघे वेगळे झाले. तिला एक मुलगी आहे, जिला ती एकटीच वाढवत आहे.