'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम चेतना भटचा नवरा आहे प्रसिद्ध गीतकार; 'दुनियादारी'साठी केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 16:34 IST2023-11-21T16:30:06+5:302023-11-21T16:34:53+5:30
chetana bhat: चेतनाच्या नवऱ्याने दुनियादारी, क्लासमेट, मितवा, श्यामची आई या सिनेमांसाठी काम केलं आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा.
या कार्यक्रमातील जवळपास सगळ्याच कलाकारांनी आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
सध्या या कार्यक्रमातील अभिनेत्री चेतना भट हिची चर्चा रंगली आहे. उत्तम अभिनय आणि विनोदबुद्दी यांच्या जोरावर चेतनाने लोकप्रियता मिळवली.
चेतना कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयी दररोज अनेक चर्चा रंगत असतात.
चेतनाप्रमाणेच तिचा नवरादेखील कलाविश्वाशी निगडीत आहे.
चेतनाच्या नवऱ्याचं नाव मंदार चोळकर असं असून तो प्रसिद्ध गीतकार आहे.
मंदारने अनेक लोकप्रिय मराठी सिनेमांसाठी काम केलं आहे.