धनश्रीसोबत घटस्फोट, आता युजवेंद्र चहलच्या आयुष्यात नवी 'हिरोईन', नेमकी आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:42 IST2025-03-10T11:29:09+5:302025-03-10T11:42:15+5:30
युजवेंद्र चहलच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा जोरदार सुरु झाली.

भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. नुकतंच तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ( ICC Champions Trophy) काल (९ मार्च २०२५) भारत आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना पाहण्यासाठी पोहचला होता. यावेळी त्याचा शेजारी एक 'सुंदरी' बसलेली दिसली.
भारताने न्यूझीलंडला पराभूत (India Wins The Champions Trophy) करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ उचलली. त्यामुळे सर्व भारतीय सध्या आनंदात आहेत. पण, सर्वांत जास्त आनंदात आहेत, ते म्हणजे युजवेंद्र चहलचे चाहते. आपल्या लाडक्या खेळाडूला 'मिस्ट्री गर्ल'सोबत पाहिल्यानंतर चहलच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आल्याचा अंदाज त्यांनी बांधला आहे.
खरंतर नुकतंच काही दिवसांपुर्वी युजवेंद्र चहलने धनश्री वर्मापासून घटस्फोट (Yuzvendra Chahal Divorce With Dhanashree Verma ) घेतला. युजवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या ४ वर्षानंतर वेगळे झाले. सध्या तो एकटाच आहे. धनश्री वर्माला घटस्फोट दिल्यानंतर तो आता एका मिस्ट्री गर्लसोबत दिसल्याने चर्चा सुरू झाली आहे.
चार वर्षांचा संसार मोडल्यानंतर युझवेंद्र हा थोडासा दुःखी असेल, असं चाहत्यांना वाटलं होतं, परंतु तो दुबईत मॅच पाहायला एका मुलीसोबत दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आता ती नेमकी आहे तरी कोण ? काय करते? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये (Champions Trophy In Dubai) युजवेंद्र चहलसोबत जी मिस्ट्री गर्ल दिसली, तीचं नाव माहवश (Mahvash) असं आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतली. तर जामिया मिलिया इस्लामिया येथून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिनं रेडिओ जॉकी म्हणून रेडिओ मिर्ची ९८.३ एफएम मधून कारकिर्दीची सुरुवात केली.
अलीगढमध्ये जन्मलेली माहवश एक युट्यूबरदेखील आहे. तिने 'सेक्शन १०८' या सिनेमाची निर्मिती केली आहे. याशिवाय, ती लवकरच एका सीरिजमध्ये झळकणार आहे.
याआधी ते अनकेदा एकत्र स्पॉट झाले होते. त्यांच्या डेटिंगच्या अफवांनी जोर धरला होता. पण, तिनं डेटिंगच्या अफवांना "निराधार" असं म्हटलं होतं. तसेच चाहत्यांना गोपनीयतेचा आदर करण्याचे आणि कोणत्याही खोट्या बातम्या पसरवू नयेत, असे आवाहनही केलं होतं. मात्र स्टेडियममध्ये पुन्हा एकत्र दिसल्यानंतर दोघांबददलच्या चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे खुद्द माहवशने तिच्या इन्स्टाग्रामवर चहलसोबतचे (Yuzvendra Chahal-RJ Mahvash) फोटो पोस्ट केले आहेत. कॅप्शमध्ये तिनं 'टीम इंडियासाठी मी लकी आहे' असंही म्हटलं आहे. यावरुन तिनं चहलसोबत नात कन्फर्म केल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत.माहवशने तिच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती विविध व्हिडीओ शेअर करत असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
दरम्यान, युजवेंद्र चहलनं डान्सर आणि कंटेंट क्रिएटर धनश्रीसोबत २२ डिसेंबर २०२० साली लग्न केलं होतं. त्यांचे रील्स, डान्स व्हिडिओ नेहमी व्हायरल व्हायचे. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. लग्नानंतर ४ वर्षातच दोघांनी घटस्फोट घेतला.