अंदर की बात ! स्टारकिड्सच्या नाईट लाईफचे Photo व्हायरल; डान्स, गाणी अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:34 PM2023-02-16T12:34:36+5:302023-02-16T12:56:03+5:30

स्टारकिड्सच्या नाईट पार्टीतले बरेच फोटो आता व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड कलाकारांपेक्षा आजकाल स्टारकिड्सचीच चर्चा जास्त आहे. स्टारकिड्स जिथे जिथे दिसतात तिथे पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी करतात.

या स्टारकिड्सच्या रात्रीच्या पार्ट्याही रंगात आलेल्या असतात. झगमगाट, महागडे हॉटेल अशा ठिकाणी सर्व स्टारकिड्स भेटतात आणि त्यांची पार्टी रंगात येते.

अनेकदा नशेत हॉटेलमधून बाहेर पडातानाचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. त्यांचे असे फोटो पाहून नेटकरी कायम त्यांना ट्रोल करतात.

या स्टारकिड्समध्ये शाहरुखची मुलं आर्यन खान, सुहाना खान, अजय देवगणची लेक न्यासा देवगण, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, त्यांचा मित्र ओरी, शनाया कपूर, श्वेता तिवारीचा लेक पलक तिवारी यांचा समावेश असतो.

सध्या त्यांच्या या जंगी पार्टीतले आतले फोटो व्हायरल होत आहेत. त्यांच्या या पार्ट्यांवर नेहमीच बोट दाखवले जाते. खरंच या पार्टीत आतमध्ये काय होतं हे फोटोंमधून कळते.

नेहमीच माध्यमात चर्चेत असलेले हे स्टारकिड्सचे फोटो आहेत. कोणी ड्रिंक्स करताना दिसतंय तर कोणी एकमेकांसोबत cozy झाले आहेत. अशा इंटिमेट अवस्थेतले फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

डान्स, गाणी, खाणं-पिणं असा फुल पार्टी माहोल मध्ये स्टारकिड्स एंजॉय करताना दिसतात. अगदी रात्रभर त्यांची ही पार्टी रंगलेली असते.

नुकतेच अजय देवगणची लाडकी लेक न्यासा देवगणचे नशेतील फोटो पाहून युझर्स भडकले होते. धडपडत, बॉडीगार्ड्सचा आधार घेत बाहेर पडत असल्याचा तिचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यावर युझर्सने चांगलेच खडेबोल सुनावले.

सर्व स्टारकिड्सचा कॉमन फ्रेंड ओरी अवत्रामनीने हे फोटो शेअर केले आहेत. ख्रिसमस, न्यू इयर किंवा इतर फंक्शन्सला हे स्टारकिड्स जोरदार धुरळा उडवताना दिसतात.