विराट-अनुष्कासारखं 'हे' बॉलिवूड स्टार्स आहेत प्रेमानंद महाराजांचे भक्त, मुंबईहून वृंदावनला येतात दर्शनासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:02 IST2025-05-16T16:54:03+5:302025-05-16T17:02:27+5:30

हे स्टार्स प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईहून वृंदावनला येतात!

प्रेमानंद महाराज ( Premanand Maharaj Vrindavan) हे वृंदावनधील एक प्रसिद्ध संत आहे.

त्यांच्याबद्दल लोकांना विशेष आदर आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी दिग्गज वृंदावनमध्ये पोहचतात.

अलीकडेच विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर पत्नी अनुष्का शर्मासह ( Virat Kohli Visits Premanand Maharaj In Vrindavan With Anushka ) त्यांना भेटण्यासाठी वृंदावनला पोहोचला होता.

प्रेमानंद महाराजांना भेटल्यानंतर कोहली आणि अनुष्का खूप आनंदी ( ( Virat Kohli Anushka In Vrindavan) दिसत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट दिसून आले.

फक्त विराट आणि अनुष्का नाही तर आणखीही काही बॉलिवूड कलाकारांनी महाराजांचे आशिर्वाद घेतले आहेत.

प्रेमानंद महाराजांच्या भक्तांमध्ये पंजाबी गायक मिका (Mika Singh In Vrindavan) याचाही समावेश आहे. गेल्यावर्षी तो प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहचला होता.

लोकप्रिय अभिनेते आशुतोष राणा (Ashutosh Rana Visits Premanand Maharaj) हेदेखील प्रेमानंद महाराजांच्या दरबारात पोहचले होते. यावेळी दोघांमध्ये खूप खास गप्पा झाल्या होत्या. तसेच आशुतोष राणा यांनी प्रेमानंद महाराजांना शिव तांडवही ऐकवलं होतं.

बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांनीदेखील प्रेमानंद महाराजांचे आशिर्वाद घेतले होते. तेव्हा त्यांनी वीस मिनिटे एकांतात अध्यात्मावर चर्चा केली होती.

अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) हे २०२३ मध्ये पत्नी, मुलगा आणि मुलीसह प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी वृंदावनला त्यांच्या आश्रमात गेले होते. त्यावेळी प्रेमानंद महाराजांनी रवी किशन यांना सांगितलं होतं की, प्रे"तुम्हाला खात्री करावी लागेल की तुमच्या पदाचा गैरवापर होणार नाही. चांगल्या प्रशासन ठेवा आणि नितिमत्ता सोडू नका".

पंजाबी गायक बी प्राक यानेदेखील प्रेमानंद महाराजांचे आशिर्वाद घेतले होते. बी प्राक हा एक गायक आणि संगीत दिग्दर्शक आहे, ज्यांचे खरे नाव प्रतीक बच्चन आहे.