Photos: कुर्ता फाड हल्दी...! Vikrant Masseyने शेअर केले हळदीचे धम्माल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 03:38 PM2022-02-20T15:38:48+5:302022-02-20T15:45:41+5:30

Vikrant Massey Sheetal Thakur Haldi Photos: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या 18 तारखेला लग्नबंधनात अडकला. या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता विक्रांतच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या 18 तारखेला लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेन्ड शीतल ठाकूरसोबत त्याने लग्नगाठ बांधली.

या लग्नाचे काही फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता विक्रांत व शीतलच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विक्रांत व शीतलने हळदीत नुसती धूम केली. कुर्ता फाड हल्दी, असं लिहित विक्रांतने हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विक्रांत व शीतल सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी 14 फेब्रुवारीला नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि 18 तारखेला दोघंही पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकले.

विक्रांत व शीतलने 2019 मध्ये साखरपुडा केला होता. दोघंही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. कोरोना महामारीमुळे या कपलचं लग्न अनेकदा लांबणीवर पडलं होतं.

लग्नाचा मुहूर्त अनेकदा पुढे ढकलला गेल्यानंतर दोघांनी इंटिमेंट वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. नुकताच विक्रांत शीतलसोबत नव्या घरात शिफ्ट झाला आहे. या गृहप्रवेशाचे फोटो विक्रांतने सोशल मीडियावर शेअर केले होते.

जून 2020 मध्ये, विक्रांतने शीतलसाठी एक भावुक करणारी पोस्ट लिहिली होती. शिवाय शीतल ठाकूरसोबतच्या नात्यावरही शिक्कामोर्तब केलं होतं.

विक्रांत व शीतल ठाकूर यांनी ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’च्या पहिल्या सीझनमध्ये एकत्र काम केलं होतं. याचदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.