'परिणीता'मध्ये संजय दत्तसोबत होता इंटिमेट सीन, त्याआधी काय घडलं? विद्या बालन म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:29 IST2025-07-23T10:15:59+5:302025-07-23T10:29:53+5:30

शूटआधी संजय दत्तने माझ्या खोलीचा दरवाजा वाजवला...विद्याने सांगितलं नक्की काय घडलं

अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सध्या चर्चेत आहे. तिने कमालीचं वजन घटवलं असून तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी तिने आपल्या ग्लॅमरस लूकने लक्ष वेधून घेतलं आहे.

विद्या बालनने एंटी इन्फ्लामेटरी डाएटने १० किलो वजन कमी केलं आहे. शरिरातील इन्फ्लामेशन कमी करण्यावर तिने लक्ष दिलं. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच चकित झाले आहेत.

विद्याने २००५ साली 'परिणीता' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमातून तिने सैफ अली खान आणि संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली.

विद्याने आपल्या पहिल्याच सिनेमात दोन्ही अभिनेत्यांसोबत इंटिमेट सीन दिले होते. यावेळी ती प्रचंड नर्व्हस होती. संजय दत्तसोबत सीन करण्याआधी काय घडलं हे तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.

'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विद्या म्हणाली, "संजय दत्तसोबत माझा इंटिमेट सीन शूट होणार होता. त्याआधी सकाळी सकाळीच तो माझ्या रुमबाहेर आला. त्याने दरवाजा वाजवला."

"मी दरवाजा उघडला. तेव्हा तो मला म्हणाला, 'विद्या मी खूप नर्व्हस आहे. आपण हा सीन कसा करणार आहोत?' मी विचार केला ही हा तर खुद्द संजय दत्त आहे. इतका अनुभवी कलाकार असूनही हा मला असं का विचारतोय?"

"नंतर मला समजलं की हे सगळं संजयने मला कंफर्टेबल वाटावं म्हणून केलं होतं. त्याची उदारता बघा. त्याच्या या कृतीने माझा सगळा नर्व्हसनेस निघून गेला. हा माझा पहिलाच इंटिमेट सीन होता. याआधी मी कधीही असा सीन केला नव्हता."

"मला त्याचं हे वागणं खूप आवडलं. शूटनंतर तो स्वत: माझ्याजवळ आला आणि मी ठीक आहे ना? असं त्याने मला विचारलं. नंतर तो माझ्या कपाळावर किस करुन निघून गेला. म्हणूनच संजय दत्त हा 'संजय दत्त' आहे. त्याची जवळून नेहमीच चांगला सुगंधही येतो."

'परिणीता' सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. विद्या लवकरच रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये दिसणार आहे.