एका मस्करीतून सुरू झाली होती विकी-कतरिनाची लव्हस्टोरी, मग लग्नापर्यंत घडलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:05 IST2025-02-12T11:46:06+5:302025-02-12T12:05:36+5:30

Vicky kaushal-Katrina Kaif's love story : विकी कौशल सध्या छावा सिनेमामुळे चर्चेत आहे. तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे आहेत. त्यांची लव्हस्टोरीदेखील हटके आहे. एका मस्करीतून सुरू झालेल्या नात्याचं रुपांतर लग्नात झाले.

विकी कौशल सध्या छावा सिनेमामुळे चर्चेत आहे. तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे आहेत. त्यांची लव्हस्टोरीदेखील हटके आहे. एका मस्करीतून सुरू झालेल्या नात्याचं रुपांतर लग्नात झाले.

त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात, कतरिना आणि विकीने हे अगदी गुपित ठेवले होते. दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसणे टाळायचे आणि नंतर अचानक २०२१ मध्ये दोघांनीही लग्नाची घोषणा केली आणि मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली.

खरं तर, या प्रेमकथेची सुरुवात करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये एका छोट्या विनोदाने झाली होती.

करण जोहरने विकी कौशलला विचारले होते की कतरिनाला त्याच्यासोबत चित्रपटात काम करायचे आहे. तिला वाटतेय की त्यांची जोडी छान दिसेल.

करण जोहरकडून हे ऐकून विकी कौशलने अतिशय ब्लशिंग प्रतिक्रिया दिली आणि बेशुद्ध झाल्याचे नाटक केले.

यानंतर दोघेही एकमेकांना गुपचूप डेट करू लागले. दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण ही केमिस्ट्री लोकांसमोर आली.

एका शोदरम्यान विकी कौशलनेही कतरिनाला अतिशय मजेशीर पद्धतीने प्रपोज केले होते. खरंतर या शोदरम्यान सलमान खानही उपस्थित होता.

विकीने कतरिनाला सगळ्यांसमोर सांगितलं होतं की लग्नाचा सीझन सुरू आहे, तू माझ्यासारख्या चांगल्या मुलाशी लग्न का करत नाहीस.

काही काळानंतर विकी कौशलच्या या विनोदाचे वास्तवात रुपांतर झाले आणि दोघांनी राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले. आज ते सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.

विकी कौशल लवकरच 'छावा' चित्रपटात दिसणार आहे.