कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:55 IST2025-05-16T13:25:01+5:302025-05-16T14:55:52+5:30

विकी कौशलने कतरिना कैफसोबत लग्न जरी केलं असलं तरीही त्याची पहिली गर्लफ्रेंडही एक अभिनेत्री होती. दोघं अनेकदा पार्टी, इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे

विकी कौशलचा आज वाढदिवस. २०२५ मध्ये विकीने 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडला धमाकेदार सुरुवात करुन दिली

विकीने काही वर्षांपूर्वी कतरिना कैफसोबत लग्न केलं. विकी आणि कतरिनाची जोडी चाहत्यांची लाडकी जोडी आहे.

विकी कौशल आणि कतरिना एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते. परंतु कतरिनाशी लग्न करण्यापूर्वी विकी एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता

ही अभिनेत्री म्हणजे हरलीन सेठी. हरलीन आणि विकी या दोघांनी कधीही एकमेकांचंं रिलेशनशीप लपवलं नाही. विकीच्या 'उरी' सिनेमाचं जोरदार प्रमोशन हरलीनने केलं होतं.

विकी आणि हरलीन अनेकदा पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे. परंतु अचानक दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

विकी आणि हरलीनच्या ब्रेकअपमागे कतरिना कारण असल्याचं मीडियामध्ये छापून आलं. विकीच्या कतरिनासोबत रिलेशनशीपच्या बातम्या बाहेर आल्यावर हरलीनने विकीला अनफॉलो करुन त्याच्याशी दुरावा ठेवला.

विकी-हरलीन दोघांनीही एकमेकांच्या प्रायव्हसीचा मान ठेवला. पुढे विकीने कतरिनाशी लग्न करुन दोघांचा सुखी संसार सध्या सुरु आहे.