सौंदर्यात जान्हवी, सारालाही टक्कर! कोण आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत झळकणारी 'ही' अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:49 IST2025-08-09T15:42:19+5:302025-08-09T15:49:37+5:30
कोण आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत झळकणारी 'ही' अभिनेत्री?

बॉलिवूडमधील प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप यांच्याकडे बघितले जाते. सध्या सिनेसृष्टीत त्यांच्या आगामी निशांची या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातून बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्या ठाकरे इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे.
अलिकडेच 'निशांची' सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरेसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून कोण झळकणार हे जाणून घेण्यास प्रचंड उत्सुक आहेत.
या बहुचर्चित चित्रपटात ऐश्वर्य ठाकरेसह वेदिका पिंटो, मोनिका पानवार, मोहम्मद झीशान आयुब आणि कुमुद मिश्रा हे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटात ऐश्वर्यसोबत वेदिका पिंटो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र, वेदिकाची चर्चा सुरू आहे. तर चला जाणून घेऊया कोण आहे वेदिका पिंटो?
वेदिका पिंटो ही एक उत्तम अभिनेत्री आहे.वेदिकाचा जन्म १४ ऑक्टोबर १९९५ रोजी मुंबई येथे झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच पूर्ण केलं आहे.
'ऑपरेशन रोमियो' हा तिचा करिअरमधील पहिलाच चित्रपट होता. यानंतर वेदिका आदित्य रॉय कपूरसोबत 'थडम'चा रिमेक असलेल्या 'गुमराह'मध्ये दिसली होती.
वेदिकाने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये देखील काम केलं आहे. २०१९ मध्ये, वेदिका 'लिग्गी' या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली. त्यामुळे ही अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आली.
अभिनयाव्यतिरिक्त वेदिका एक उत्तम डान्सर देखील आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती अनेक फॅशन ब्रँड आणि जाहिरातींमध्येही काम करायची.