'बॉर्डर २'मध्ये दिसणार 'या' चार सौंदर्यवती; ग्लॅमरमध्ये प्रत्येकीचा लूक आहे एकदम हटके, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:00 IST2025-12-16T17:53:07+5:302025-12-16T18:00:11+5:30
Border 2 Movie : 'बॉर्डर २' चा टीझर प्रदर्शित झाला असून या मल्टीस्टारर चित्रपटात चार अभिनेत्री देखील दिसणार आहेत. या चारही जणी सौंदर्याच्या बाबतीत एकमेकींना टक्कर देतात.

'बॉर्डर २' चा टीझर प्रदर्शित झाला असून या मल्टीस्टारर चित्रपटात चार अभिनेत्री देखील दिसणार आहेत. या चारही जणी सौंदर्याच्या बाबतीत एकमेकींना टक्कर देतात.

'बॉर्डर २' मध्ये जसे चार मुख्य अभिनेते आहेत, तसेच त्यांच्यासोबत चार मुख्य अभिनेत्री देखील दिसणार आहेत. या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस आहेत. स्टाईलच्या बाबतीत प्रत्येकीचा अदा अतिशय वेगळ्या आहेत.

या यादीत पहिले नाव मोना सिंगचे आहे. मोना सिंग याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरीजमधील तिच्या भूमिकेमुळे प्रचंड चर्चेत राहिली होती. आता मोना 'बॉर्डर २' मध्ये दिसणार आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये ती सनी देओलसोबत दिसली आहे, त्यामुळे या चित्रपटात ती सनी देओलच्याच अपोझिट दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोनम बाजवा देखील 'बॉर्डर २' मधील मुख्य अभिनेत्रींपैकी एक आहे. ती या चित्रपटात दिलजीत दोसांझच्या अपोझिट दिसणार आहे.

या वर्षी सोनमने 'एक दिवाने की दिवानियत' आणि 'हाउसफुल ५' सारख्या चित्रपटांमधून चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या ग्लॅमरस अवतारामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' मधून प्रसिद्धी मिळालेली आन्या सिंग देखील 'बॉर्डर २' चा भाग आहे. ही अभिनेत्री या चित्रपटात अहान शेट्टीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

आन्या खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे आणि सोशल मीडियावर अनेकदा तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

मेधा राणा 'बॉर्डर २'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती वरुण धवनच्या अपोझिट दिसणार आहे.

मेधा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि आपल्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची मने जिंकताना दिसते.

















