गेली १४ वर्ष वजन वाढू नये म्हणून मनोज वाजपेयी करत आहेत 'ही' गोष्ट, आजोबांनी सांगितलाय फिटनेस मंत्र
By देवेंद्र जाधव | Updated: November 26, 2025 15:19 IST2025-11-26T13:52:13+5:302025-11-26T15:19:45+5:30
वयाची पन्नाशी ओलांडलेला अभिनेता मनोज वाजपेयी इतका फिट अँड फाईन कसा काय? जाणून घ्या सविस्तर

मनोज वाजपेयी हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. 'सत्या', 'आरक्षण', 'राजनीती', 'शूल' अशा विविध सिनेमांमधून मनोज वाजपेयींनी स्वतःमधल्या अभिनेत्याला सिद्ध केलं.

मनोज वाजपेयी ५६ व्या वर्षीही एकदम फिट अँड फाईन आहेत. मनोज वाजपेयींच्या तंदुरुस्तीमागचं छोटंसं कारण समोर आलंय. जे तुम्हालाही उपयोगी पडेल

मनोज वाजपेयींनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. गेल्या १४ वर्षांपासून मनोज वाजपेयी रात्रीचं जेवण टाळत आहेत. ते रात्री जेवत नाहीत.

स्वतःच्या आजोबांपासून प्रेरणा घेऊन मनोज वाजपेयी ही गोष्ट पाळत आहेत. फिट राहण्यासाठी रात्रीचं जेवण न करणं, हा नियम ते गेल्या १४ वर्षांपासून पाळत आहेत.

हा नियम पाळल्याने माझे आजोबा खूप बारीक होते. पण तरीही ते फिट होते, असं वक्तव्य मनोज वाजपेयींनी केलं होतं. आजोबांचा हा नियम पाळणं मनोज वाजपेयींसाठी फायदेशीर ठरलं

सध्या मनोज वाजपेयी दिवसातून केवळ एकदाच पूर्ण जेऊन नंतर १२ ते १४ तास उपवास करतात. त्यामुळे शरीर हलकंफुलकं राहतं, वजन नियंत्रणात राहतं आणि इतर आजार उद्भवत नाहीत, असं मनोज वाजपेयी म्हणाले.

मनोज वाजपेयी 'द फॅमिली मॅन ३' वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. या वेबसीरिजमधील मनोज यांच्या भूमिकेचं पुन्हा कौतुक होतंय

















