महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्याशी जोडलं गेलं तारा सुतारियाचं नात, गणेशोत्सवात खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:55 IST2025-09-03T11:56:57+5:302025-09-03T12:55:00+5:30

मोठ्या राजकीय कुटुंबाची सून होणार तारा सुतारिया?

'स्टुडंट ऑफ द इअर २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) हिनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं. या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. ग्लॅमरस तसंच बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत आहे. सिनेमांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही बरीच चर्चा होते. आता पुन्हा एकदा ती तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून तारा सुतारिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या थोरल्या मुलीचा मुलगा वीर पहाडियाला (Veer Pahariya) डेट करत आहे.

आता तारा सुतारिया आणि वीरनं त्याचं नात अधिकृत केलंय. दोघांनी सोबत फोटोशूट केलंय. गणेश उत्सवात ताराने वीर पहारियासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

ताराने भरजरी साडी परिधान केली. त्यात ती प्रचंड सुंदर दिसतेय. केसात गजरा माळल्यानं तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

"भक्ती, श्रद्धा आणि उत्सव.. गणपती बाप्पा मोरया" असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलंय.

तर वीरने पारंपरिक पोशाख परिधान केला होता. यात तो नेहमीप्रमाणे राजबिंडा दिसतोय.

वीर हा स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा मुलगा आहे. प्रणिती शिंदे आणि स्मृती शिंदे या बहिणी आहेत. मावशी खासदार झाल्यानंतर वीरनं सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला होता.

त्यामुळं वीर-तारा यांचं लग्न झाल्यास तारा आणि प्रणिती यांच्यात जवळचं नातं असणार आहे. प्रणिती या ताराच्या मावस सासू अर्थात मावशी सासूचं नातं होईल.

काही दिवसांपुर्वी रॅम्प वॉक दरम्यान तारा सुतारियाने वीर पहाडियाला फ्लाइंग किस दिल्याने या जोडप्याच्या नात्याची चर्चा अधिकच वाढली. अभिनेत्री अलीकडेच एपी ढिल्लनसोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती, ज्याच्या फोटोवर वीरच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वीर पहारियाने 'माय शायनी स्टार' अशी कमेंट केली. तर ताराने रिप्लाय करत, 'माईन' असं लिहिलं.

याआधी वीरचं नाव सारा अली खान आणि मानुषी छिल्लरसोबत जोडलं गेलं होतं. तर तारा ही करीना कपूरचा आतेभाऊ आदर जैनसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण, त्यांचं नात टिकलं नाही. वीरनं 'स्काय फोर्स' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.