घाऱ्या डोळ्यांची नायिका! 'बॉर्डर'मध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकलेली 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता दिसते अशी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:34 IST2025-12-16T17:24:45+5:302025-12-16T17:34:28+5:30
'बॉर्डर' मध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकलेली 'ही' नायिका आठवतेय? २८ वर्षात इतका बदलला लूक

काही चित्रपट हे अनेकवेळा पाहूनही त्यांचा कंटाळा येत नाही. साल १९९७ साली प्रदर्शित झालेला असाच एक चित्रपट जो आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात.या चित्रपटाचं नाव म्हणजे बॉर्डर.

उत्कृष्ट कलाकार, कसदार अभिनय, मनाला भिडणारे संगीत या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे या चित्रपटाने १९९७ साली सर्वाधिक कमाई केली होती. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला "बॉर्डर" चित्रपट प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवणारा चित्रपट आहे.

या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, कुलभूषण खरबंदा यांसारख्या कलाकारांनी आपली भूमिका पडद्यावर जिवंत केली.

दरम्यान, या चित्रपटात सुनील शेट्टीच्या रुपात एका भारतीय सैनिकाचं वैवाहिक आयुष्य दाखवण्यात आलं होतं. बॉर्डरमध्ये अभिनेत्री शरबानी मुखर्जी यांनी सुनील शेट्टीची ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारली होती.

चित्रपटात सुनील शेट्टी आणि शरबानी यांच्यावर वर चित्रीत केलेलं 'तो चलूँ, तो चलूँ...' हे गाणे आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, या चित्रपटानंतर शुभांगी इंडस्ट्रीपासून दुरावली.

अभिनय क्षेत्रापासून दूर असल्या तरी शरबानी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय असल्याच्या पाहायला मिळतात. बॉर्डर चित्रपटातील ही घाऱ्या डोळ्यांची नायिका आता फारच बदलली आहे.

शरबानी मुखर्जींचा २८ वर्षानंतर लूक पूर्णपणे बदलला आहे. त्या ओळखूच येत नाही.

















