जॅकलिनसाठी सुकेशचं तुरूंगातून नवं पत्र, म्हणाला- "तू सुपर हॉट आहेस, नवरात्रीच्या ९ दिवसांत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 01:03 AM2023-10-15T01:03:52+5:302023-10-15T01:24:49+5:30

जॅकलिन अन् सुकेशचे काही 'प्रायव्हेट' फोटो व्हायरल झाले होते

Jacqueline Fernandez Sukesh Chandrashekhar: जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री आहे. ती अभिनेत्री आणि मॉडेल असली तरी गेल्या काही काळापासून नकारात्मक गोष्टींमुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे.

२०० कोटी खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता असा दावा केला जातो.

सुकेश तुरूंगात आहे. पण अजूनही जॅकलिनवर त्याचं तितकंच प्रेम आहे. तो तुरुंगातूनही तिला सातत्याने पत्र लिहितो.

सुकेश सध्या दिल्लीच्या मंडोली तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पण तो बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती.

जॅकलीनने सुकेशसोबत कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध नाकारले असले तरी तो आरोपी असलेल्या प्रकरणात ED ने अनेकदा जॅकलिनची चौकशी केली आहे.

तशातच रविवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या आधी जॅकलीनसाठी सुकेशने थेट तुरूंगातून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने जॅकलिनसाठी एक खास गोष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे.

सुकेशने पत्रात लिहिले आहे, “बेबी, पहिली गोष्ट म्हणजे तू दोहा शोमध्ये खूप हॉट आणि सुंदर दिसत होतीस. तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही."

"बेबी, या नवरात्रीत मी तुझ्यासाठी नऊ दिवस उपवास करणार आहे. असं केल्याने तुझं आरोग्य चांगलं राहिल आणि आसपासची नकारात्मकता दूर होईल," असे पत्रात लिहिले आहे.

तसेच, नवरात्रीच्या नवव्या दिवशी वैष्णोदेवी मंदिर आणि महाकालेश्वर मंदिरात जॅकलीनसाठी विशेष पूजेची व्यवस्था करण्याचा सुकेशचा मानस असल्याचाही दावा करण्यात आला आहे.