अबब! स्कर्टच्या किंमतीत घ्याल ३ लग्झरी कार, बॅगच्या दरात २ वेळा जगभ्रमंती कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 10:30 PM2023-11-07T22:30:54+5:302023-11-07T22:34:14+5:30

सुहाना खानलाही तिचे वडील शाहरुख खानप्रमाणे बॉलिवूड सुपरस्टार बनायचे आहे. अभिनेत्री होण्यापूर्वीच सुहाना खान खूपदा चर्चेत राहिली आहे. इंस्टाग्रामवर सुहानाला ४.३ मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

चाहत्यांनी सुहानाच्या फोटोंवर भरभरून कमेंट करून तिचं कौतुक केले आहे. नुकतेच सुहाना खानने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये सुहानाने ४५ लाखांपेक्षा जास्त किमतीचा ड्रेस घातला आहे

सुहानाच्या या ड्रेसचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुहानाने १ नोव्हेंबरला तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यामध्ये सुहाना खान फॉक्स लेदरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

सुहानाने काळ्या रंगाचा पेन्सिल स्कर्ट घातला होता, जो तिच्या सौंदर्यात भर घालत होता. सुहानाने कॉर्डेड कॉर्सेट स्टाइल टॉप घातला होता. सुहानाच्या हातात पिवळ्या रंगाची बॅगही दिसली.

जेव्हा चाहत्यांनी सुहानाच्या ड्रेसची किंमत ऑनलाइन तपासली तेव्हा त्यांना धक्काच बसला. सुहानाच्या टॉपचा ब्रँड रायस्नी '(Rhycni)' आहे.

वोगच्या रिपोर्टनुसार, सुहानाने परिधान केलेल्या स्कर्टची किंमत ४४ लाख ६७ हजार ५३३ रुपये आहे. संपूर्ण ड्रेसची एकूण किंमत ४५ लाखांपेक्षा जास्त आहे.

या रकमेत ३ लक्झरी कार खरेदी करता येतील. इतकेच नाही तर सुहानाने ड्रेससोबत पिवळ्या रंगाची बॅगही कॅरी केली होती. मायक्रो लेडी डायर बॅगचीच किंमत ३ लाख २४ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. सुहानाचा हा लूक खूप चर्चेत आहे.

एकट्या बॅगच्या खर्चात दोनदा जगभर फिरता येते. सुहानाच्या या महागड्या फॅशनची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. चाहत्यांनीही तिच्या पोस्टवर कमेंट करून सुहानाच्या लुकचे कौतुक केले आहे.

सुहाना खानही आता बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. सुहाना खान लवकरच नेटफ्लिक्सच्या 'द आर्चीज' चित्रपटात दिसणार आहे. झोया अख्तर या सिनेमातून स्टारकिड्सला लाँच करत आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, सुहाना खान आणि श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूर यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

सुहाना पदार्पणापूर्वीच स्टार बनली आहे. लाखो लोक सुहानाला फॉलो करतात. सुहानाचेही तिच्या वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होण्याचे स्वप्न आहे.