मराठी कुटुंबात जन्मलेल्या 'या' सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:39 IST2025-02-24T13:15:19+5:302025-02-24T13:39:44+5:30
आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी (Sridevi). आज श्रीदेवी आपल्यात नाही तरीही तिचे सिनेमे पाहून आजही चाहत्यांचं मनोरंजन होतं.
श्रीदेवी इतकी अप्रतिम अभिनेत्री होती की देशभरात तिचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे.
श्रीदेवी ही एकमेव महिला सुपरस्टार होती, जिचे चित्रपट फक्त तिच्या नावाने हिट व्हायचे.
श्रीदेवीचा देवावर प्रचंड विश्वास होता. तुम्हाला माहितेय श्रीदेवीनं एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या अभिनेत्यासाठी ७ दिवसांचा उपवास केला होता.
आता हा अभिनेता कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तो सुपरस्टार म्हणजे कर्नाटकातील एका मराठी कुटुंबात जन्मलेला शिवाजी राव गायकवाड अर्थात रजनीकांत.
रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्यात खूप चांगले संबंध होते. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष आवडीची होती.
डेक्कन क्रॉनिकलनुसार, २०११ मध्ये रजनीकांत यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना तातडीनं सिंगापूरला उपचारासाठी नेण्यात आलं होतं. श्रीदेवी यांना ही बातमी कळताच त्या खूप अस्वस्थ झाल्या.
तेव्हा रजनीकांत लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी श्रीदेवीनं देवाकडे पार्थना केली होती.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही श्रीदेवी गेली होती. फक्त पार्थनाचं नाही तर रजनीकांत यांच्यासाठी सात दिवस उपवासही केला होता.
श्रीदेवी यांचे प्रयत्न कामी आले आणि रजनीकांत पूर्णपणे बरे होऊन सिंगापूरहून भारतात परत आले. रजनीकांत घरी परतल्यावनर श्रीदेवीनेपती बोनी कपूरसह रजनीकांत यांच्या घरी जात भेट घेतली होती.
दुबईत एका लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेल्या असताना २४ फेब्रुवारी २०१८ ला श्रीदेवीच निधन झालं होतं. श्रीदेवीच्या अकस्मात निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. आजही चाहते श्रीदेवीची आठवण जागवतात.