श्रीसंतचा मैदानाबाहेरही होता जलवा, बॉलिवूडच्या 'या' ५ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 06:41 PM2022-03-10T18:41:13+5:302022-03-10T18:55:16+5:30

S Sreesanth Affairs : क्रिकेटच्या मैदानासोबतच श्रीसंत बाहेरही वादात राहत होता. त्याचं नाव ५ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. यातील एक होती सुरविन चावला.

वर्ल्ड कप विजेता भारतीय टीमचा सदस्य राहिलेला वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने बुधवारी सर्वच क्रिकेट फॉर्ममधून सन्यास घेतला. त्यांच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी ७ वर्ष बंदी घालण्यात आली होती. २०२० मध्येच श्रीसंतने क्रिकेटमध्ये वापसी केली होती.

श्रीसंत आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सकडून क्रिकेट खेळला. त्याने टीम इंडियासाठी २७ टेस्ट, ५३ वनडे आणि १० टी२० सामने खेळले. त्याने टेस्टमध्ये ८७, वनडेमध्ये ७५ आणि टी२० मध्ये ७ विकेट्स घेतल्या.

क्रिकेटच्या मैदानासोबतच श्रीसंत बाहेरही वादात राहत होता. त्याचं नाव ५ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. यातील एक होती सुरविन चावला. 'हेट स्टोरी २' सिनेमातील अभिनेत्री सुरवीन आणि श्रीसंतची भेट २००८ मध्ये एका रिअॅलिटी शोदरम्या झाली होती. ज्यानंतर त्यांना अनेकदा सोबत पाहण्यात आलं. २००९ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.

श्रीसंत आणि रिया सेन यांचंही नाव जोडण्यात आलं होतं. २०११ मध्ये दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. युवराज सिंहसोबत मैत्री खराब होऊ नये म्हणून रिया श्रीसंतपासून दूर गेली होती. युवीसोबत मैत्री तुटल्यानंतर रियाने पुन्हा श्रीसंतसोबत मैत्री केली. पण पुढे काही झालं नाही.

साऊथ इंडियन सिनेमांची अभिनेत्री राय लक्ष्मीसोबतही श्रीसंतचं नाव जुळलं होतं. दोघांना अनेकदा सोबत बघण्यात आलं होतं. पण हे रिलेशनही जास्त काळ चालू शकलं नाही. राय लक्ष्मीचं नाव कधीकाळी महेंद्र सिंह धोनीसोबतही जोडलं गेलं होतं.

बॉलिवूडमध्ये 'बचना ऐ हसीनों' आणि 'किडनॅप'सारख्या आणखीही काही सिनेमात दिसलेल्या मिनीषा लाम्बासोबतही श्रीसंतचं नाव जोडलं गेलं होतं. सुरवीनसोबत ब्रेकअप झाल्यावर त्याची मिनीषासोबत मैत्री झाली होती. यांनाही अनेकदा एकत्र बघण्यात आलं होतं. पण हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही.

त्यानंतर साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरनसोबतही श्रीसंत नाव जोडलं गेलं होतं. २००८ मध्ये त्यांच्याविषयी चर्चा होत होती. अशीची चर्चा झाली होती की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. पण नंतर श्रिया श्रीसंतपासून वेगळी झाली. तिला तिच्या करिअरवर फोकस करायचं होतं.