काजलइतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; दाक्षिणात्य कलाविश्वाशी आहे संबंधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:00 AM2022-04-21T07:00:00+5:302022-04-21T07:00:02+5:30

kajal aggarwal sister: अनेक जण काजलच्या बहिणीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. या अभिनेत्रीने सिंघम चित्रपटातून बॉलिवूडमध्येही स्थान मिळवलं.

अलिकडेच काजलने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.

काजलच्या बहिणीने ही गूडन्युज सोशल मीडियावर शेअर केली. तेव्हापासून काजलच्या बाळासह तिच्या बहिणीचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

अनेक जण काजलच्या बहिणीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

काजलची बहिणी तिच्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

काजलच्या बहिणीचं नाव निशा अग्रवाल असून तिचं लग्न झालेलं आहे.

निशाने २८ डिसेंबर २०१३ मध्ये बिझनेसमॅन करण वलेचा याच्याशी लग्न केलं आहे.

करण आणि निशा यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. त्यावेळी निशा औरंगाबादमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती.

हैदराबादला पुन्हा येण्यापूर्वी निशाने काही काळ ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये इंटर्नशीप केली.

निशा सोशल मीडियावर सक्रीय असून सतत तिचे अपडेट चाहत्यांना देत असते.

निशाही काजल इतकीच सुंदर दिसते.