Sonam Kapoor : सोनम कपूरला कधीच व्हायचं नव्हतं अभिनेत्री; 15 व्या वर्षी आली हॉटेलात काम करायची वेळ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 12:14 PM2023-06-09T12:14:46+5:302023-06-09T12:44:14+5:30

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

अनिल कपूरची लाडकी लेक आणि अभिनेत्री सोनम कपूर आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनम बॉलिवूडच्या कपूर घराण्यातील आहे, ती अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची चुलत बहीण आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

सोनम चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची कामे करायची आणि तिला कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते. सोनम कपूरच्या फिल्मी करिअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से जाणून घ्या...

सोनमला वयाच्या 15 व्या वर्षी वेट्रेस म्हणून काम करावं लागलं होतं. तिला हे काम का करावं लागलं, हा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल. सोनम कपूरने हे काम कोणत्याही नायलाजातून केलं नाही तर तिचा पॉकेटमनी वाढवण्यासाठी आणि तिच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी केले आहे.

जेव्हा सोनम फक्त 15 वर्षांची होती तेव्हा तिने एका रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली जिथे ती वेट्रेस म्हणून काम करायची पण सोनम कपूरने 1 आठवड्यानंतर ही नोकरी सोडली. सोनम कपूरने 2007 मध्ये रणबीर कपूरसोबत संजय लीला भन्साळीच्या सावरिया या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. मॉडेलिंग विश्वातील प्रसिद्ध नाव सोनम कपूरला अभिनेत्री बनण्याची इच्छा कधीच नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनीच तिला चित्रपटांच्या दुनियेशी ओळख करून दिली.

सोनम दिग्दर्शकाच्या सूचनेवरूनच चित्रपटांकडे वळली. सोनम कपूरने तिच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 20 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, यापैकी केवळ 5-6 चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.

एक काळ असा होता जेव्हा सोनम खूप लठ्ठ होती, तिच्या लठ्ठपणामुळे लोक तिची कॉलेजच्या दिवसात चेष्टा करायचे. ज्याचा खुलासा खुद्द सोनमने केला होता, सोनम वयाच्या 15 ते 20 वर्षी PCOC आजाराने ग्रस्त होती, त्यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सोनम कपूरचा पती आनंद आहुजा लोकप्रिय बिझनेसमन आहे. त्याची नेटवर्थ इतकी जास्त आहे की बॉलिवूडचे मोठे सेलेब्सही त्याच्यासमोर फिके आहेत. सोनम सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे. तिला एक गोंडस मुलगा असून त्यांच नाव वायु कपूर आहुजा आहे.

सोनमचं पती आनंद आहुजासोबत खूप छान बॉन्डींग आहे. कामातून वेळ काढून ते एकत्र वेळ घालवतात. सोनम कपूरने 2018 मध्ये आनंद आहुजासोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

आनंद आहुजा मोठा बिझमेसमन आहे. आनंद आहुजा खूप श्रीमंत आहे. त्याची नेट वर्थ बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींपेक्षा जास्त आहे. आनंद आहुजाचा जन्म 29 जुलै 1983 रोजी झाला. 38 वर्षीय आनंद हा फॅशन उद्योजक आहेत आणि त्यांचा व्यवसाय अनेक क्षेत्रात पसरलेला आहे.