किंग खान शाहरुखने आपल्या धाकट्या मुलाचं नाव 'अबराम' का ठेवलं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:58 IST2025-05-28T18:35:46+5:302025-05-28T18:58:24+5:30

शाहरुखचा धाकटा लेक अबराम खानची सध्या चर्चा आहे.

बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय.

फक्त भारतामध्येच नाही तर जगभरात शाहरुखचा चाहतावर्ग आहे. चाहत्यांचं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे.

शाहरुख खानचं त्याच्या कुटुंबावर खूप जीव आहे. खास करुन धाकटा मुलगा अबरामवर.

तुम्हाला 'अबराम' नावाचा अर्थ माहितेय? शाहरुखनं एका मुलाखतीमध्ये लेकाच्या नावाचा अर्थ आणि ते नाव का ठेवलं, याचं कारण सांगितलं होतं.

किंग खानची दोन मुलं आर्यन आणि सुहानापेक्षा लहान मुलगा अबराम याच्या नावाचं खासं महत्त्व आहे.

शाहरुख खानने रजत शर्मा यांचा शो 'आप की अदालत' मध्ये आपल्या मुलाचं नाव अबराम का ठेवलं याचा खुलासा केला होता.

अभिनेत्याने सांगितलं होतं की, "इस्लाममध्ये हजरत इब्राहिमला अब्राहम देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे यहुदी धर्म आणि बायबलमध्ये अबराम म्हणतात. अबराम म्हणजे देवाशी जोडलेली व्यक्ती, जी सकारात्मक विचारसरणी दाखवते".

धर्मनिरपेक्षतेच्या महत्त्वावर भर देताना, शाहरुख म्हणाला, "माझी पत्नी हिंदू आहे आणि मी मुस्लिम आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या मुलांना घरात धर्मनिरपेक्षतेची भावना जाणीव व्हावी असं वाटतं. अनेकांना ते आवडले नाही आणि ते वादग्रस्त ठरलं, परंतु मला वाटतं की आमच्या घरातही आपल्या देशासारखीच धर्मनिरपेक्षता आहे".

शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबरामचा जन्म २७ मे २०१३ रोजी सरोगसीद्वारे झाला. आता तो १२ वर्षांचा झाला आहे.

सध्या तो धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.