Sanjay Khan Birthday: संजय खानने ५ स्टार हॉटेलमध्ये झीनत अमानला केली होती मारहाण, संपलं होतं त्यांचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 03:36 PM2022-01-03T15:36:23+5:302022-01-03T15:45:26+5:30

Sanjay Khan Birthday : अब्दुल्लाह सिनेमाच्या सेटवर दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. संजय यांचं आधीच लग्न झालं होतं आणि त्यांना तीन मुलंही होती.

आज अभिनेता संजय खानचा वाढदिवस. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९४१ ला बंगळुरूमध्ये झाला होता. संजय यांनी १९६४ मध्ये चेतन आनंदचा सिनेमा हकीकतमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. संजय खान यांनी ७० च्या काळात मेला, उपासना, धुंध आणि नागिनसारख्या सिनेमात काम केलं.

३० वर्षात त्यांनी ३० सिनेमात काम केलं. त्यानंतर २००० सालापर्यंत त्यांनी टीव्हीवर मालिकांमध्येही काम केलं. संजय खान यांनी अनेक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं. संजय खान हे त्यांच्या सिनेमांसोबतच लव्हस्टोरीमुळेही चर्चेत होते.

संजय खान आणि झीनत अमानच्या अफेअरचे किस्से बॉलिवूडमध्ये आजही चर्चेत असतात. चर्चा तर अशीही होती की, झीनत अमानने विवाहित संजय खान यांच्यासोबत गुपचूप लग्न केलं होतं.

अब्दुल्लाह सिनेमाच्या सेटवर दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. संजय यांचं आधीच लग्न झालं होतं आणि त्यांना तीन मुलंही होती.

अब्दुल्लाह सिनेमाचं शूटींग संपल्यावर संजय खान यांनी झीनत अमान यांना फोन करून एक गाणं शूट करण्यास सांगितलं. पण त्यावेळी झीनत अमान फार बिझी होत्या. डेट नसल्याने झीनत अमान यांनी गाणं शूट करण्यास नकार दिला.

. ज्यामुळे संजय खान चांगलेच भडकले आणि झीनत अमान यांना खूप सुनावलं होतं. झीनत जेव्हा संजय यांच्या घरी गेल्या तेव्हा संजय हे ताज हॉटेलमध्ये पार्टी करत होते. झीनत तिथे गेल्या.

झीनत अमान ताज हॉटेलमध्ये पोहोचल्या तेव्हा दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. मग काय संजय खान यांनी सर्वांसमोर झीनत अमानला मारहाण केली. यावेळी झीनत यांचा जबडा तुटला होता आणि उजव्या डोळ्यालाही इजा झाली होती. या घटनेमुळे दोघांचं नातं तुटलं.

संजय खान यांनी या घटनेबाबात त्यांची बायोग्राफी द बिग मिस्टेक ऑफ माय लाइफमध्ये लिहिलं आहे. असंही सांगितलं जातं की, संजय खान यांची पत्नी झरीन रूममधून आली आणि तिने पतीला रोखण्याऐवजी त्याला चीअर करत होती.

टीपू सुल्तान मालिकेवेळी संजय खान भाजले होते. ८ जानेवारी १९९० ला टीपू सुल्तानच्या सेटवर जेव्हा आग लागली तेव्हा तिथे ४० लोक उपस्थित होते. यात संजय खान स्वत:ही भाजले होते. त्यांचं ६५ टक्के शरीर भाजलं होतं. १३ दिवसात त्यांच्या ७३ सर्जरी झाल्या होत्या. आजही त्यांच्या चेहऱ्यावर काही निशाण दिसतात.