सख्खे भाऊ-पक्के व्हिलन! हिरोसुद्धा पडला होता फिका, चित्रपटाने केली छप्परफाड कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 11:08 AM2024-01-29T11:08:42+5:302024-01-29T11:31:11+5:30

रिअल लाईफ भाऊ असलेल्या एक जोडीने रिल लाईफ खलनायकाचे पात्र साकारून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

अभिनेता हृतिक रोशनच्या एका सिनेमात एक नाही तर दोन खलनायक होते. दोन सख्खा भावांनी एकत्र पडद्यावर खलनायकाची भुमिका पार पाडली होती. दोघांच्या अभिनयाने चाहत्यांनी मने जिंकली.

हृतिक रोशनच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. तो सिनेमा होता 'काबिल'. 2017 मध्ये रिलीज झालेला 'काबिल' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या अभिनयाने नटलेला सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगले यश मिळवले आहे.

हृतिक आणि यामीचा अभिनय तसंच सिनेमाची कथा यामुळे सिनेमाने रसिकांवर जादू करत कोटींची कमाई केली.

हृतिक रोशनच्या 'काबिल' चित्रपटात रोहित रॉय आणि रोनित रॉय हे दोन्ही भाऊखलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. दोघांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. विशेष म्हणजे या चित्रपटातही रोहित आणि रोनित यांनी भावांची भूमिका साकारली होती.

एका अंध जोडप्याची हृदयस्पर्शी प्रेमकथा आपल्याला काबिल या चित्रपटात पाहायला मिळते. रोहित (हृतिक रोशन) आणि सुप्रिया (यामी गौतम) दोघेही अंध असतात. पण तरीही ते दोघेही आपल्या आयुष्याचा आनंद घेत असतात. पहिल्याच भेटीत दोघांनाही आपण एकमेकांचे जोडीदार होऊ शकतो याची जाणीव होते आणि ते दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात.

सगळे काही सुरळीत सुरू असताना पण शेलार (रोनित रॉय) या नगरसेवकाच्या भावाची, अमितची (रोहित रॉय) नजर सुप्रियावर पडते आणि रोहित घरात नसताना तो एका मित्राच्या मदतीने तिच्यावर बलात्कार करतो. पोलीसांच्या मदतीने नगरसेवक हे प्रकरण दाबतो.

आपल्याला न्याय मिळणार नाही याची जाणीव रोहित आणि सुप्रियाला होते. त्यामुळे या सगळ्यातून रोहित आणि सुप्रिया स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याचवेळी सुप्रियावर अमित आपल्या मित्रासोबत परत एकदा बलात्कार करतो. अमित या गोष्टीची आता सतत पुनरावृत्ती करणार या भीतीने सुप्रिया आत्महत्या करते आणि तिथून सुरु होते एका सुडाची कथा.

मग अंध असलेला रोहन स्वतःला सज्ज करतो आणि शत्रूशी लढून पत्नीच्या हत्येचा बदला घेतो असे या सिनेमाचे कथानक आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित 'काबिल' प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

'काबिल' सिनेमाचे प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही कौतुक केले होते. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, हृतिक रोशनचा 'काबिल' हा चित्रपट 35 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. तर पाच पट जास्त कमाई सिनेमाने केली होती.

हृतिक रोशन, रोनित रॉय आणि रोहित रॉय यांच्या 'काबिल' चित्रपटाने भारतात 104 कोटींचा व्यवसाय केला. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात १७८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. अशाप्रकारे 'काबिल'ने खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई करून निर्मात्यांचे खिशे भरले होते.