Richa Chadha Wedding Photos: रिचा चड्ढा-अली फजलचं प्री-वेडिंग फोटोशूट आलं समोर, दिसले रोमँटिक अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 05:03 PM2022-10-02T17:03:34+5:302022-10-02T17:08:03+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

रिचा चढ्ढा आणि अली फजल ४ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. रिचा आणि अलीने प्री-वेडिंग फंक्शनसाठी पेस्टल रंग निवडले. (फोटो इन्स्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर रिचा चड्ढाने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “ I hide YOU in my eyes “ ~ Rumi #RiAli blessed

रिचा आणि अलीचा लग्नसोहळा दिल्लीत पार पडणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रिचा आणि अली येत्या ४ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. रिचा आणि अलीच्या लग्नातील सर्व कार्यक्रमांमध्ये अन्नाची नासाडी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.