PHOTOS : लव्ह अफेअर अन् बोल्ड फोटोशूट, रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 03:39 PM2022-12-23T15:39:53+5:302022-12-23T15:45:43+5:30

Rhea Chakraborty : होय, गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. रिया सध्या बंटी सजदेहला डेट करत असल्याची चर्चा आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे रिया चक्रवर्ती. सध्याही रियाचीच चर्चा आहे.

होय, गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. रिया सध्या बंटी सजदेहला डेट करत असल्याची चर्चा आहे.

अद्याप रियाने बंटी सजदेहसोबतच्या लव्ह रिलेशनशिपबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही. पण हो, नवे फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

होय, रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रिया ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसतेय.

या फोटोतील रियाचा लुक बघण्यासारखा आहे. व्हाईट कलर ऑफ शोल्डर शॉर्ट वन पीसमध्ये तिने एकापेक्षा एक ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. काही तासांत हजारांवर लोकांनी तिच्या या फोटोंना लाईक केलं आहे. अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करून रियाचं कौतुक केलं आहे.

रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये बोटावर मोजण्याइतके सिनेमे केलेत. त्यातही सर्वच्या सर्व फ्लॉप. पण आता रियाने कमबॅकची तयारी सुरु केली आहे.

गेल्या 9 वर्षांत म्हणजे 2012 ते 2020 या काळात रियाने एकूण 7 सिनेमे केलेत. पण यातला एकही सिनेमा हिट नव्हता. पुढे रियाचं नाव सुशांत प्रकरणात आला. ड्रग्ज प्रकरणात ती अडकली.