८०० कोटींच्या पटौदी हाऊसमध्ये रणबीरच्या 'ॲनिमल'चे शूटिंग; पाहा भव्य पॅलेसची खास झलक...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:14 PM2023-12-07T13:14:45+5:302023-12-07T13:25:36+5:30

अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला ॲनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

अभिनेता रणबीर कपूर मु्ख्य भूमिकेत असलेला ॲनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. २ डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सतत चर्चेत आहे.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल हा सिनेमा दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करताना दिसतोय. अवघ्या काही दिवसांत या सिनेमाने ४०० कोटींचा आकडा पार केला आहे. परंतु या चित्रपटाच्या कथानकाबरोबर चर्चेचा विषय बनला आहे तो ॲनिमल सिनेमातील शूट झालेला बंगला. अभिनेता सैफ अली खानच्या पटौदी पॅलेसमध्ये या चित्रपटाचे शूट केले आहे.

ॲनिमल या सिनेमामध्ये रणबीर कपूर पटौदी पॅलेसमध्ये राहतो असे दाखवण्यात आले आहे. जवळपास ८०० कोटी इतकी किंमत असलेला पटौदी पॅलेस कोणत्याही राजवाड्यापेक्षा कमी नाही.

आलिशान पटौदी पॅलेस या शाही बंगल्यामध्ये एक भले मोठे मैदान, स्विमिंग पुल तसेच एकंदरीत १५० खोल्या आहेत. ज्यामध्ये सात ड्रेसिंग रुम, ड्राइंग रुम आहेत. भारतीय तसेच इस्लामिक शैलीचा अनोखा देखावा म्हणजे पटौदी हाऊस म्हणावे लागेल.

पटौदी हाऊस हे दिल्लीमध्ये स्थित आहे. १९३० मध्ये पटौदींचे शेवटचे शासक नवाब इफ्तिखार अली खानने यांनी पटौदा पॅलेस बांधला होता. नवाब इफ्तिखार अली खान हे अभिनेता सैफ अली खानचे आजोबा आहेत.

अभिनेता सैफ अली खान आपल्या कुटुंबासोबत पटौदी पॅलेसमध्ये राहण्यासाठी जातो. वेकेशनसाठी सैफचे कुटुंब येथे अनेकदा आल्याचे पाहायला मिळते. अॅनिमल चित्रपटात दाखवण्यात आलेला हा भव्य बंगला अनिल कपूर यांचा असल्याचे दाखवले आहे.

बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या चित्रपटांचे तसेच वेबसिरीजचे शूटिंग पटौदी पॅलेसमध्ये करण्यात आले आहे. वीर जारा, मंगल पांडे, मेरे ब्रदर की दुल्हन या सिनेमांचे शूटिंग पटौदी पॅलेसमध्ये झाले आहे.