रणबीर-आलियाचा नवीन घरात प्रवेश, कपूर कुटुंबाचा सुंदर फोटो अल्बम; राहाचीही दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:10 IST2025-12-05T12:06:49+5:302025-12-05T12:10:52+5:30

आलियाचा साडीतील सुंदर लूक, अनेक गोड क्षण कॅमेऱ्यात कैद

रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी नुकताच नवीन घरात प्रवेश केला आहे. आलियाने शेअर केलेल्या फोटो अल्बममध्ये घराची झलकही दिसत आहे.

कपूर कुटुंबाचा हा नवा आशियाना २५० कोटींचा आहे. गेल्या महिन्यातच कपलने नवीन घरात पूजा केली. आलियाने पूजेचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

आलिया, रणबीर, नीतू कपूर आणि चिमुकली राहा यांची झलक दिसते. तसंच भट आणि कपूर कुटुंबातील इतर सदस्यही दिसत आहेत.

घरात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा फोटोही लावलेला आहे. या फोटोसमोर नीतू आणि सून आलिया यांच्या गळाभेटीचा कँडीड फोटो अतिशय सुंदर आला आहे. तर दुसऱ्या फोटोत रणबीर फोटोसमोर उभा राहून नमस्कार करत आहे.

पूजेवेळी हवन करताना आलिया भट हात जोडून बसलेली आहे. यावेळी तिने सुंदर साडी नेसली आहे. त्यावर गोल्डन ज्वेलरी घातली आहे. आणखी एका फोटोत रणबीरने राहाचा हात हातात घेतला आहे आणि तिच्या हातात अक्षता आहेत.

राहाचा तिसरा वाढदिवसही याच घरात साजरा करण्यात आला होता. त्याचीही झलक काही फोटोंमधून दिसत आहे. आलियाने राहाचा चेहरा दाखवलेला नाही मात्र काही फोटोंमधून तिची छोटी झलक दिसत आहे.