सस्पेन्स, अॅक्शन, ड्रामा! 'या' आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर काय पाहता येणार? घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:01 IST2025-06-12T15:48:39+5:302025-06-12T16:01:49+5:30
जूनचा दुसरा आठवडा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाल करणारा असणार आहे.

जून महिन्यातील दुसरा आठवडा हा चित्रपट आणि सीरिजप्रेमींसाठी खास आहे. एकामागून एक चित्रपट आणि शो प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच पर्वणी (OTT Release ) मिळणार आहे
यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे 'राणा नायडू' या सीरिजचा दुसरा सीझन (Rana Naidu Season 2). सुपरस्टार राणा दग्गुबाती आणि वेंकटेश यांची ही क्राइम ड्रामा सीरिज १३ जून रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे.
लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा 'द ट्रेटर्स' (The Traitors) हा शो सध्या चर्चेत आहे. आज म्हणजेच १२ जून रोजी प्राइम व्हिडीओवर हा शो स्ट्रीम होत आहे. दर गुरुवारी रात्री ८ वाजता हा शो पाहता येणार आहे.
या शोमध्ये २० सेलिब्रिटींची वर्णी लागली आहे. स्पर्धकांना खेळात टिकून राहण्यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. यासाठी बुद्धी चातुर्य आणि शक्तीचाही कस लागणार आहे. या शोमध्ये "निष्पाप" आणि "धोखेबाज" अशी दोन गट असतील. सूत्रसंचालक करण जोहर सुरुवातीलाच काही स्पर्धकांना "धोखेबाज" म्हणून निवडेल. ज्यांना इतर "निष्पाप" स्पर्धकांना शोमधून बाहेर काढण्याचा टास्क देण्यात येईल.
'इन ट्रान्झिट' (In Transit) हा खास माहितीपट १३ जून रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. यात ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या खऱ्या आयुष्यावर आधारित कथा आणि त्यांच्या संघर्षाचे वास्तव मांडलं गेलेलं आहे.
एका मल्याळम चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येतोय. 'अलाप्पुझा जिमखाना' (Alappuzha Gymkhana) असं या चित्रपटाचं नाव आहे. १० एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने फक्त पाच दिवसांत आपले बजेट तर वसूल केलं होतं.
'अलाप्पुझा जिमखाना' उद्या १३ जून रोजी सोनी लिव्हवर येत आहे. बॉक्सिंग स्पर्धेवर आधारित एक मोटिवेशनल स्पोर्ट्स कॉमेडी फिल्म आहे.
थिएटरनंतर ओटीटीवर येणारा आणखी एक चित्रपट म्हणजे 'केसरी चॅप्टर २' (Kesari Chapter 2). अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे अशी स्टारकास्ट असलेला चित्रपट उद्या १३ जून रोजी ओटीटीवर येतोय. तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
सुपरस्टार समांथा रूथ प्रभू हिचा पहिला प्रॉडक्शन चित्रपट 'शुभम' (Shubham) आता थिएटरमध्ये धुमाकूळ घालल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. हा तेलुगू हॉरर-कॉमेडी चित्रपट १४ जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे.